Success Story : शेळीपालनातून फुलवला संसार; वर्षाला 8-9 लाखांची कमाई, पाहा व्हिडीओ

Success Story farmer earn 8 -9 lakh income from Goat breeding Agricultural supplement business
Success Story farmer earn 8 -9 lakh income from Goat breeding Agricultural supplement business

शेळीपालनातून फुलवला संसार; वर्षाला मिळतात आठ ते नऊ लाख रूपये

टाकळी हाजी(पुणे) : जिरायत शेती, पाण्याची कमतरता त्यातून उत्पादनाची हमी नाही. त्यातून हार मानायची नाही. खाचखळगे, डोंगरमाथा तुडवत काटेरी रस्त्यावर चारा, पाण्याची व्यवस्था करत यशस्वितेचा मार्ग सुखकर करण्याची धडपड अशा कष्टावर नक्कीच सुखाची फुले उमलतात. नियोजनबद्ध शेती पूरक व्यवसाय केला तर त्यातून भरभराटी झाल्याशिवाय रहात नाही. एका शेळी पासून पन्नास शेळ्यांचा शेळीपालन व्यवसाय करून कान्हूर मेसाई ( ता. शिरूर ) येथील वयाची सत्तरी पार केलेले शेतकरी फक्कड गेनूजी खर्डे यांनी डोळे दिपवणारी आणी मार्गदर्शक ठरणारी किमया केली आहे. 

खर्डे यांनी एक शेळी पासून शेळी पालन व्यवसाय सुरू केला आहे. गेली 32 वर्षे शेळीपालनाचा शेतीपूरक व्यवसाय म्हणून करत आहेत. गेली पाच वर्षोपासून मुलगा दादाभाऊ खर्डे हा देखील या शेळीपालनाच्या व्यवसायाकडे वळाला आहे. यासाठी कोणत्याही बॅकेचे कर्ज त्यांनी घेतले नाही. तळेगाव दाभाडे येथील रूडसेट इस्टिस्टूट मध्ये त्यांनी शेळीपालनाचे प्रशिक्षण घेतले आहे. पारंपारीक शेळी पालनाला त्यांनी फाटा देऊन वडीलांच्या या व्यवसायाकडे लक्ष दिले. यासाठी शिरोही, तोतापूरी, सानेन, सोजत, बिटल जातीचे बोकड आणले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 



सुरवातीला गावरान जातीच्या शेळ्यांवरच संकर (कॅास ब्रिडींग ) प्रयोग केला. व्यवस्थित नियोजन केल्याने प्रजननाच्या माध्यमातून त्यांना शेळीपालनासाठी वेगवेगळ्या जातीच्या शेळ्या मिळाल्या.  सध्या त्याच्याकडे विविध जातीच्या 50 शेळ्या, 10 बोकड व 40 लहान करडे आहेत. वडील व मुलगा दोघेही या शेळ्यांना रानात चरावयास नेतात. त्यामुळे त्यांना चाऱ्यासाठी वेगळा खर्च करावा लागत नाही. घराजवळ त्यांनी शेळ्यासाठी लहानसा गोठा तयार केला आहे. शेतावर शेततळे केले असल्याने पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन होते.

भाजी विकणाऱ्याच्या घराला आग; छोट्या रस्त्यामुळं अग्नीशमनची गाडी पोहोचलीच नाही.

प्रजनानातून वर्षातून दोन वेळा शेळीपासून उत्पादन मिळते. एक शेळी साधारण दोन ते तीन करडे देते. या त्यांच्या शेळीपालनाच्या व्यवसायातून वर्षाला जवळपास 8 ते 9 लाख रूपयांचे उत्पादन मिळते. आजार पण व औषधांसाठी किरकोळ खर्च येतो. पण पशुवैद्यकिय दवाखान्यातून मदत झाल्यास तोही खर्च वाचविता येईल. त्यांच्या या गोठ्यात वेगवेगळ्या जातीचे बोकड देखील पहावयास मिळतात. दोन दिवसापूर्वी त्यांनी सानेन जातीचा बोकड 35 हजार रूपयांना विकला.

''पाण्याची कमतरता असल्याने शेळीपालनासाठी तरूणांना या भागात मार्गदर्शन होणे आवश्यक आहे. शेतीपूरक व्यवसाय करताना तरूणांनी जेष्ठांचे मत विचारात घ्यावे. शेळ्यांना चाऱ्यासाठी फिरवतो त्यातून चारा खर्च वाचतो व शेळ्यांचे आरोग्य व्यवस्थित राहते.'' असे फक्कड खर्डे यांनी सांगितले. 
DJ लावून निघाली शाही वरात, पोहोचली थेट पोलीस ठाण्यात  
''शेतीत कष्ट करून पाहिजे त्या प्रमाणे उत्पादन मिळते मात्र बाजारभाव व निसर्गापुढे पाहिजे तसे उत्पादन मिळत नाही. आई वडीलांच्या आर्शीवादाने पारंपारिक व्यवसायाला प्रशिक्षणाची साथ मिळाली. त्यामुळेच शेळीपालनातून प्रगती करू शकलो. भविष्यात बॅकेच्या माध्यमातून आत्याधुनीक शेळी पालनासाठी गोठा तयार करावायाचा आहे. त्यातून बिबट्यापासून बचाव होऊ शकतो'' असे दादाभाऊ खर्डे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com