esakal | पुणे : खडकवासला धरणातून 11 हजार 491 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

Khadakwasala Dam

पुणे : खडकवासला धरणातून 11 हजार 491 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

sakal_logo
By
राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला : खडकवासला धरण साखळीतील चारी धरण शंभर टक्के भरले आहेत. या चार ही धरणातून विसर्ग सुरू आहे. खडकवासला धरणातून सोमवारी रात्री आठ वाजता आठ हजार ५६० क्युसेक विसर्ग सुरू होता.

पानशेत धरणातून वीजनिर्मितीसाठी सहाशे आणि सांडव्यातून दोन हजार ६९२ असा एकूण तीन हजार २९२ क्युसेक्स विसर्ग आंबी नदीत सुरू आहे. वरसगाव धरणात वीजनिर्मितीसाठी सहाशे क्यूसेकचा विसर्ग सुरू आहे. सांडव्यातून दोन हजार ६६५ क्यूसेस अशा प्रकारे तीन हजार २६५ क्यूसेकचा विसर्ग मोसे नदीत सुरू आहे.

टेमघर धरण रात्री भरल्यानंतर या धरण ओव्हरफ्लो झाले. त्यातून, तीनशे क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. पानशेत, वरसगाव व टेमघर या तिन्ही धरणातून मिळून सहा हजार ८५७ क्युसेक्स विसर्ग खडकवासला धरणामध्ये जमा होत आहे.

हेही वाचा: अलिबाग पोलिसांसमोर नारायण राणेंची हजेरी; म्हणाले...

खडकवासला धरणातून सोमवारी संध्याकाळी पाच वाजता दोन हजार ५६८विसर्ग सुरू होता. तो सहा वाजता पाच हजार१३६ क्युसेक्स करण्यात आला तर आठ वाजता तो आठ ५६० क्यूसेक करण्यात आला आहे. चार धरणातील पावसाचा जोर वाढेल तसा धरणातील विसर्ग असणार आहे. त्यामुळे नदीकडेच्या गावांनी नागरिकांनी काळजी घ्यावी. खडकवासला धरणातील विसर्ग वाढल्याने नांदेड शिवणे दरम्यानच्या पूल पाण्याखाली गेला आहे. या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

हेही वाचा: 'पेंग्विन' परग्रहावरुन आलेत?; जाणून घ्या का सुरु आहे चर्चा?

दरम्यान, सोमवारी व मंगळवारी पावसाचा जास्त पडण्याचा इशारा दिला होता. त्यामानाने, सोमवारी खडकवासला धरण साखळीत नेहमी प्रमाणे पाऊस झाला. खडकवासला येथे सकाळपासून रात्री २२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर पानशेत येथे ३२ मिलिमीटर वरसगाव येथे २२ मिलिमीटर टेमघर येथे ४९ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

loading image
go to top