निरगुडसर - नागापुर (ता. आंबेगाव) येथील सूर्यकांत दळे यांच्या विहिरीत पडलेल्या बिबट मादीला वनविभागाने सुरक्षितरित्या विहिरीतून बाहेर काढून रेस्क्यू केले ही घटना नागापुर फाटा – वळती रस्त्यालगत सोमवार (ता. ११) रोजी सकाळी घडली..नागापूर-वळती रस्त्याजवळ शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांना सकाळच्या वेळी विहिरीत काहीतरी हालचाल दिसली,यावेळी त्यांनी विहिरीत डोकावुन पाहिले असता विहिरीत बिबट्या पडलेला दिसून आला.या घटनेची माहिती पोलीस पाटील संजय पोहकर यांनी वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाची रेस्क्यु टीम घटनास्थळी दाखल झाली आणि बचावकार्य सुरू करण्यात आले..काही वेळाच्या प्रयत्नांनंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षितरित्या बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात यश मिळविले. सदर बिबट मादी दिड ते दोन वर्षाची असुन तिला माणिकडोह बिबट निवारा केंद्रात पाठवण्यात आले..मागील काही दिवसात यापरिसरात बिबट्याच्या हालचाली वाढल्या असून दुचाकीस्वारांवर हल्ल्याच्या घटनाही घडल्या आहेत. सदर मादी जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. परंतु, या परिसरात अजून बिबटे असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.