

पाणी उपलब्धतेनुसार रेशीम
कोष उत्पादनावर भर
शेतकरी नियोजन ः रेशीमशेती
-----------------
शेतकरी ः सदाशिव दामोदर वाघमारे
गाव ः केकतजळगाव, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर
एकूण शेती ः १५ एकर
तुती क्षेत्र ः चार एकर
----------------------------
केकतजळगाव (ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) येथील सदाशिव दामोदर वाघमारे हे मागील १० वर्षांपासून रेशीमशेती करत आहेत. सुरुवातीला एक एकरावर केलेली तुती लागवड त्यांनी विस्तारत ४ एकरापर्यंत वाढविली आहे. रेशीम उत्पादनासाठी त्यांनी २२ बाय १०० फूट आकारमानाच्या शेडची उभारणी केली आहे. त्यामुळे एक वेळेस चारशे अंडीपुंजांपर्यंतची बॅच घेणेे शक्य होते. शिवाय तुती लागवड जास्त क्षेत्रावर असल्यामुळे मुबलक तुती पाला उपलब्ध रेशीम अळ्यांना उपलब्ध होतो. दरवर्षी पर्जन्यमानाचा अंदाज घेऊन तुती बागेस पाण्याची उपलब्धता कशी राहील यानुसार रेशीम कोष उत्पादनाचे नियोजन केले जाते. यावर्षी पाऊस कमी असल्यामुळे कमी अंडीपुंजाची बॅच घेतल्याचे श्री. वाघमारे सांगतात.
पारंपरिक पीक पद्धतीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे शक्य होत नव्हते. अशा स्थितीत चुलत भाऊ संतोष वाघमारे यांच्याकडून प्रेरणा घेऊन रेशीम शेती करण्याचा निर्णय घेतला. कमी कालावधी, कमी पाणी आणि कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारा रेशीम व्यवसायाचे अर्थकारण समजून घेतल्यानंतर या उद्योगाची सुरुवात केल्याचे श्री. वाघमारे सांगतात.
------------------
बॅच नियोजन ः
चार एकरांतील तुती लागवडीनुसार दोन टप्प्यात बागेचे व्यवस्थापन करून बॅच घेण्याचे नियोजन करण्यात आले. . प्रति बॅच साधारण ४०० अंडीपुंज उत्पादन घेतले जाते. यावर्षी २५० अंडीपुंजाची एक बॅच आतापर्यंत पूर्ण झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत ४०० अंडीपुंजाची बॅच घेतली होती. यावर्षी पर्जन्यमान कमी असल्याने कमी अंडीपुंजाची बॅच घेण्यात आली आहे.
श्री. वाघमारे यांच्या माहितीनुसार, पाऊस चांगला असेल तर वर्षातून सात ते आठ बॅच, तर मध्यम पाऊस असेल तीन ते पाच पर्यंत बॅच घेतल्या जातात. अगदीच अत्यल्प पाऊस असेल तर दोन किंवा तीन बॅच घेण्यावर भर दिला जातो. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करणे शक्य होते.
....................................
एक एकरापासून सुरुवात ः
श्री. वाघमारे म्हणाले, की रेशीम उद्योगाची सुरुवात करण्यासाठी सुरुवातीला सुरुवातीला एक एकरावर तुती लागवड केली होती. हळूहळू व्यवसायातील बारकावे आणि अर्थकारण समजल्यानंतर टप्प्याटप्प्याने तुती लागवड क्षेत्रात वाढ करत ती पाच एकरांपर्यंत नेली. मात्र पुढे एक एकर क्षेत्र कमी करत आता चार एकरावर तुती बागेच्या व्यवस्थापनातून कोष उत्पादन घेतले जात आहे. व्यवसायामध्ये सदाशिव वाघमारे यांना पत्नी कालिंदा वाघमारे, मुलगा गजानन व दत्तात्रय तसेच दोन्ही सुनांची मदत होते.
----------
दर्जेदार कोष उत्पादनावर भर ः
रेशीम उद्योगामध्ये दर्जेदार कोष उत्पादन अत्यंत महत्त्वाचे असते. कोषाचा दर्जा जितका चांगला तितका दर अधिक मिळण्यास मदत मिळते. त्यासाठी योग्य बॅच नियोजन करून दर्जेदार कोष उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला जातो. रेशीम उद्योगातील सर्वात मोठी समस्या ही रेशीम अळ्यांवर होणारा रोगांचा प्रादुर्भाव ही असते. रेशीम अळ्यांवर प्रामुख्याने ग्रासेरी, फ्लॅचेरी, मस्करडायन यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव होतो. यामुळे अळ्यांची कोष निर्मिती क्षमता खालावते. परिणामी संपूर्ण बॅच बाद होण्याचा धोका असतो. त्यासाठी शेड निर्जंतुकीकरण, स्वच्छता यावर भर देऊन रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रयत्न केले जातात. याशिवाय रेशीम अळीवर उझी माशीचा प्रादुर्भाव होतो. त्यासाठी मच्छरदाणीचा वापर करून उझी माशीला अटकाव केला जातो.
........................
पाण्याच्या उपलब्धतेवर बॅचचे गणित
श्री वाघमारे यांच्या माहितीनुसार, पाऊस चांगला असेल तर वर्षातून सात ते आठ बॅच निघतात. मध्यम पाऊस असेल तीन ते पाच पर्यंत बॅच निघतात. आणि अगदीच अत्यल्प पाऊस असेल तर दोन किंवा तीन बॅच निघतात. अर्थात पावसाळा, पाण्याची उपलब्धता यानुसार ते रेशीम कीटक संगोपनाच्या किती बॅच घ्यायच्या याचे नियोजन केले जाते. रेशीम उत्पादनासाठी २२ बाय १०० फूट आकारमानाचे चारशे अंडीपुंजाची एक वेळेस बॅच घेण्याची क्षमता असलेले शेड आहे.
....
पाल्याच्या दर्जावर भर
तुती पाल्याचा दर्जा चांगला राखण्यासाठी सुरुवातीला एकरी आठ ते दहा ट्रॉली शेणखत वापरले जाते. आवश्यकतेनुसार शेणखत बाहेरून विकत घेतले जाते. शेणखताच्या वापरामुळे तुती पाल्याची प्रत चांगली येऊन भरघोस उत्पादन मिळण्यास मदत होते. त्याचबरोबर १०:२६:२६, अमोनिअम सल्फेट, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा तुती बागेत वापर केला जातो.
.....
विक्री नियोजन ः
रेशीम उत्पादनाला सुरुवात केल्यानंतर सुरुवातीच्या काळात रामनगरम मार्केटमध्ये कोषाची विक्री केली जात असे. पुढे जालनास, बीड मार्केटला विक्री करण्यास सुरुवात केली. सध्या बीड बाजारपेठेत चांगले दर मिळत असल्याने तेथेच विक्री करण्यावर भर दिला जात आहे.
रेशीम कोष उत्पादनात उत्पादनाच्या २० टक्के खर्च व त्यामधून ७० ते ८० टक्के निव्वळ नफा मिळत असल्याचा अनुभव सदाशिव सांगतात. त्यामुळे इतर पारंपरिक पिकांच्या तुलनेत रेशीम उद्योग अधिक शाश्वत उत्पन्न देणारा ठरतो आहे.
..........................
- सदाशिव वाघमारे, ९९२२२४९९६९
फोट ः
शेतकरी शेड सह व तुती असे दोन फोटो पाठवीत आहे.
-------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.