बारामतीत शेतमजुरांना कौशल्याधारित प्रशिक्षण यशस्वी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 5 August 2020

किटक नाशकांपासून पिकांचे आरोग्य आणि शेतकऱ्यांची सुरक्षितता सांभाळण्यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व अग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामती या संस्थांच्यावतीने विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्या पार्श्नवभूमीवर जळगाव सुपे (ता. बारामती) येथे वरील संस्थांच्यावतीने मका पिकावरील फवारणी करणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांना कौशल्याधारित प्रशिक्षण यशस्वी करण्यात आले. त्या उपक्रमातर्गंत जवळपास शंभर शेतकऱ्यांना लाभ झाल्याचे सांगण्यात आले.

माळेगाव - किटक नाशकांपासून पिकांचे आरोग्य आणि शेतकऱ्यांची सुरक्षितता सांभाळण्यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व अग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामती या संस्थांच्यावतीने विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्या पार्श्नवभूमीवर जळगाव सुपे (ता. बारामती) येथे वरील संस्थांच्यावतीने मका पिकावरील फवारणी करणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांना कौशल्याधारित प्रशिक्षण यशस्वी करण्यात आले. त्या उपक्रमातर्गंत जवळपास शंभर शेतकऱ्यांना लाभ झाल्याचे सांगण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, पिकांच्या उत्पादन वाढीसाठी शेतकरी निरनिराळे कृषी निविष्ठा, बी-बियाणे व औषधे इत्यादी वापरतात, परंतु सदरील निविष्ठा वापरताना योग्य ती काळजी न घेतल्यामुळे अधिकचे उत्पन्न तर सोडाच, परंतु संपूर्ण पीक वाया जाण्याचा धोका संभवतो. त्यासाठी पुणे येथील आत्मा संस्थेच्या मदतीने शेतकऱ्य़ांसह शेतजूरांना प्रशिक्षण दिले जात आहे, अशी माहिती आत्मा संस्थेचे प्रकल्प उपसंचालक सुभाष घाडगे यांनी प्रशिक्षण कार्य़शाळेच्या उद्घाटन प्रसंगी दिली.

कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ डॉ. मिलिंद जोशी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कीटकनाशकांच्या लेबल क्लेम या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी शेतकऱ्यांना मका या पिकासाठी कोणकोणत्या प्रकारची औषधे वापरावी व तसेच कोणत्या प्रकारचे औषधे वापर करणे टाळावे या विषयी माहिती सांगितली. बारामतीचे उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे, आत्माचे तालुका व्यवस्थापक विश्वजीत मगर,  कऱ्हामाई शेतकरी बचत गटाचे अध्यक्ष सांळुके, प्रशांत गावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

शेतकऱ्यांना आवाहन...! 
शेतकऱ्यांनी कीटकनाशकांचा नेमका व सुरक्षित वापर करण्याची पद्धत समजून घेतली पाहिजे. तसेच कीटकनाशक फवारणी सुरक्षिततेची साधनेही हाताळताना काळजी घेणे गरजेचे आहे. फवारणी ड्रेस, हात मोजे, रुमाल, गॉगल आधी साधने फवारणीच्या वेळी वापरावीत, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने करण्यात आले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Successful training of agricultural laborers in Baramati