
पुणे : माण, हिंजवडी ते शिवाजीनगर यांना जोडणाऱ्या पुणे मेट्रो लाइन ३ या प्रकल्पाची पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) शुक्रवारी घेतलेली चाचणी यशस्वी झाली.माण डेपो ते पीएमआर अशा चार स्थानकापर्यंत ही चाचणी झाली. या प्रकल्पाचे ८७ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम अंतिम टप्प्यात असल्याचे पीएमआरडीएकडून सांगण्यात आले.