

पुणे - महापालिकेने आज अचानक जंगली महाराज रस्ता आणि गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावर अचानक कारवाई करून ५० पेक्षा जास्त दुकाने, हॉटेलचे शेड, पथारीवर कारवाई केली. महापालिकेने संध्याकाळी या कारवाईची कोणालाही कुणकुण लागू न देता कारवाई केल्याने व्यावसायिकांची चांगलीच गडबड झाली.