esakal | कदमवाकवस्ती हद्दीत इंधनवाहू टँकरला अचानक आग
sakal

बोलून बातमी शोधा

इंधनवाहू टँकरला अचानक आग

कदमवाकवस्तीच्या हद्दीत इंधनवाहू टँकरला अचानक आग

sakal_logo
By
जनार्दन दांडगे.

लोणी काळभोर : पुणे - सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली ) ग्रामपंचायत हद्दीत डिझेल वाहतूक करणाऱ्या टँकरने मंगळवारी (ता. ०५ ) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अचानक पेट घेतला. चालकाने समयसुचकता दाखवून टँकर महामार्गावरून बाजूला घेतल्याने मोठी दुर्घटना टळली.

यामध्ये टँकरमधील क्लीनरला भाजले असून यामध्ये टँकरच्या केबिनचा भाग हा पूर्णपणे जाळून खाक झाला आहे. आगीचे करण अद्याप अस्पष्ट असून, हि आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची चर्चा कदमवाकवस्तीसह लोणी काळभोर परिसरात जोरदार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एम. एच. १२ एलटी ८६०० या टँकरवरील चालक विष्णू आंबेकर ( वय २८, रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली. मूळ रा. बीड जिल्हा ) हे पुणे येथील लडकत सर्व्हिस स्टेशन येथे टॅकर खाली करून पुन्हा भरण्यासाठी लोणी काळभोर येथील हिंदुस्थान पेट्रोलियम टर्मिनलकडे निघाले होते. ते कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाका परिसरात आले. त्यावेळी त्यांना टँकरच्या केबिनमध्ये वायर जळाल्याचा वास आला. परंतू गॅरेज इंडियन ऑइल टर्मिनल शेजारीअसल्याने टॅकर महामार्गावर न थांबवता दुपारी २ - ४५ वाजण्याच्या सुमारास ते गॅरेजपाशी पोहोचले व टॅकर समोरच्या मोकळ्या जागेत उभा केला.

हेही वाचा: कोव्हॅक्सिनला WHOची मान्यता मिळणार? आजच निर्णयाची शक्यता

मोकळ्या जागेत टँकर उभा केला असता केबीनमधून मोठ्या प्रमाणात धुर येवू लागला. अचानक त्याची जागा आगीने घेतली. मोठा जाळ होताच आंबेकर व क्लीनर तुळशीराम कवटे ( वय २३, रा. कदमवाकवस्ती ) हे खाली उतरले. उतरताना कवटे यांचे डाव्या हाताला भाजले. त्याला उपचारासाठी तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच शेजारी असलेल्या हिंदूस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडचा अग्नीशमन बंब तात्काळ घटनास्थळी पोहोचला. काही वेळाने पुणे महानगरपालिकेचा बंबही तेथे पोहोचला. परंतू तत्पूर्वी हिंदूस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडच्या सुरक्षा अधिकारी महेक चंगराणी व त्यांचे पथकाने आगीवर नियंत्रण मिळवले होते.

यावेळी हिंदूस्तान पेट्रोलियमचे डेप्यूटी जनरल मॅनेजर राजेंद्र वाघमारे हे स्वत: उपस्थित होते. यामध्ये फायरमन सुदाम झगडे, शिवाजी चव्हाण, सुखराज दाभाडे, यशवंत मंडले, बाबासाहेब चव्हाण, गणेश पवळ, दिपक चौरे, बापु आढाळगे यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.

दरम्यान, वरील प्रकार एक तासाहून अधिक काळ सुरु होता. त्यामुळे लोणी काळभोरसह परिसरात काही वेळ भितीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच पुणे - सोलापूर महामार्गावर दोन्ही बाजूला टँकरला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. टँकरला आग लागल्याचे लक्षात येताच, चालकांने व क्लीनर याने आग शमविण्याचे प्रयत्न सुरु केले. मात्र अग्निशामक दल पोचण्यापुर्वीच टँकरच्या केबिनचा भाग जळून खाक झाला होता. आग नेमकी शॉर्टसर्किटमुळे की अन्य कारणामुळे लागली याची परिसरात जोरदार चर्चा आहे.

loading image
go to top