esakal | कोव्हॅक्सिनला WHOची मान्यता मिळणार? आजच निर्णयाची शक्यता I Covaxin
sakal

बोलून बातमी शोधा

Covaxin

कोव्हॅक्सिनला WHOची मान्यता मिळणार? आजच निर्णयाची शक्यता

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : हैदराबाद येथील भारत बायोटेकनिर्मित कोव्हॅक्सिन लसीला WHOच्या इमर्जन्सी युज लिस्टिंगमध्ये (EUL) समावेशाबाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात पावणे पाच वाजता महत्वाची बैठक होणार आहे. कोव्हॅक्सिन ही भारतातील पहिली स्वदेशी कोरोना प्रतिबंधक लस आहे.

हेही वाचा: प्रियांका गांधींसह ११ जणांविरोधात FIR; शांतता भंग केल्याचा आरोप

WHOनं आत्तापर्यंत पीफायझर, अमेरिकेच्या जॉन्सन अँड जॉन्सन, मॉडर्ना, चीनची सिनोफार्म आणि युकेच्या ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेका या लसींना आपत्कालिन वापरासाठी मंजुरी दिली आहे. गेल्या महिन्यात भारत बायोटेकनं म्हटलं होतं की, WHOकडे मंजुरीसाठीची संपूर्ण डेटा शेअर केला असून याच्या फिडबॅकची वाट पाहत आहेत. भारत बायोटेकचं म्हणणं आहे की, कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल्समध्ये ही लस ७७.८ टक्के कार्यक्षम आहे.

हेही वाचा: CM बघेल एअरपोर्टवर बसले धरणे देत; प्रियांकांच्या भेटीसाठी जाताना अडवलं

कोव्हॅक्सिनच्या मान्यतेसाठी प्रक्रियेबाबत बोलताना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी म्हटलं होतं की, WHO कडून कोव्हॅक्सिनच्या मान्यतेबाबत लवकरच निर्णय येईल अशी अपेक्षा आहे.

loading image
go to top