
Junnar Flood
Sakal
ओतूर : जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा धरणांमधून रविवारी पहाटे ३.३० वाजे दरम्यान अचानक पुष्पावती नदी दोन ते अडीच हजार क्युसेसने पाणी सोडल्याने नदिवरील मोटारी आणि नदी लगतच्या शेतीचे व शेतातील पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून गोठ्यात पाणी शिरल्याने एक गाय जागीच ठार झाली आहे.त्यामुळे कुकडी पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारा बाबत नागरीकांकडुन नाराजी व्यक्त केली जात आहे.