Sudhakar Prabhu Passed Away : प्रख्यात उद्योजक सुधाकर प्रभू यांचे लंडनमध्ये निधन

जगातील विविध देशांमध्ये प्रभू यांनी मोठमोठे प्रकल्प उभारले.
passed away
passed awaysakal
Updated on

Sudhakar Prabhu passed away - उद्योजक सुधाकर श्रीरंग प्रभू (वय ८७) यांचे लंडन येथे नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, लेखिका डॉ. मीना प्रभू, चिरंजीव तुषार, आशू, कन्या वर्षा काळे व नातवंडे असा परिवार आहे.  

passed away
Pune Crime: शिवाजीनगर परिसरात नदीत सापडला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; शहर परिसरात खळबळ

सुधाकर प्रभू हे मूळचे कोकणातले. व्हीजेआयटीतून त्यांनी स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली. त्यानंतर लंडनमधील प्रसिद्ध ‘इंपेरिअल कॉलेज'मधून त्यांनी पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. इंग्लंडमधील ‘पेल फ्रिशमन' तसेच भारतातील ‘फ्रिशमन प्रभू' या कंपन्यांचे ते भागीदार होते.  

 जगातील विविध देशांमध्ये प्रभू यांनी मोठमोठे प्रकल्प उभारले. भव्य इमारती, मेट्रो आणि महामार्गांचे काम त्यांनी केले. इंग्लंडमधील हॉटेल मेट्रोपोल, ड्रेपर्स गार्डनची इमारतही त्यांनीच साकारली. ड्रेपर्स गार्डनचा बेस समोर ठेऊनच त्यांनी ‘बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज'ची इमारत उभारली.

passed away
Pune: पावसामुळे अन् निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अनेक रस्त्याची दुरवस्था; खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यावर खड्डे, हेच कळेना

लंडनमधील ‘सेंटर पॉईंट’ या इमारतीच्या उभारणीबद्दल ‘इन्स्टिट्यूट स्ट्रक्चरल इंजिनिअर्स' या संस्थेकडून त्यांचा ‘ऑस्कर फेबर मेडल'ने गौरव करण्यात आला होता. या शिवाय युरोपातील सर्वांत उंच इमारत म्हणून गणल्या गेलेल्या ‘नॅशनल वेस्टमिनस्टर बँक टॉवर' (टॉवर ४२) या इमारतीचे निर्माणही त्यांनी केले.

passed away
Pune News : पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात शिकणाऱ्या नाशिकच्या तरुणाची आत्महत्या; घटनेने खळबळ

 मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, दिल्ली मेट्रो या ठिकाणीही त्यांच्या फर्मची कन्सल्टन्सी होती. नागपूरचा पहिला उड्डाणपूलही त्यांनी साकारला. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजसोबतच मुंबई हाय ऑईल फिल्ड, पणजी मार्केट, अशा कितीतरी प्रकल्पांना त्यांनी आकार दिला. वानखेडे स्टेडियम, तसेच बालेवाडी क्रीडा संकुलाचा प्रकल्प त्यांनी त्यांचे कनिष्ठ बंधू व प्रसिद्ध आर्किटेक्ट शशी प्रभू यांच्या समवेत पूर्णत्वास नेला.  

इंग्लंडमधील महाराष्ट्र मंडळासह भारतातीलही अनेक संस्थांना त्यांनी सढळ हस्ते आर्थिक मदत केली. ब्रिटनमधून परदेशात निर्यात करण्याच्या योगदानासाठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा पुरस्कारही त्यांना ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांच्या हस्ते देण्यात आला होता. कमलाकर खानोलकर हे त्यांचे ज्येष्ठ बंधू, तर मृदुला सरनाईक या त्यांच्या धाकट्या भगिनी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com