shri vighnahar sugar factory
sakal
जुन्नर - गळीत हंगामात दररोज आठ हजार मेट्रिक टनाहून अधिक उसाचे गाळप व ऊस तोडणी वेळेवर होणार आहे. उसाच्या वजनाची शंका असल्यास खासगी वजन काट्यावर ऊस वाहनाचे वजन करण्यास कारखान्याची कोणतीही हरकत राहणार नाही. असे प्रतिपादन श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी ४० व्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना केले.