
पुणे : राज्यातील साखर कारखान्यांत काम करणाऱ्या कामगारांच्या वेतनात दहा टक्के वाढ होणार आहे. त्यामुळे त्यांचे महिन्याचे उत्पन्न २८०० रुपयांपर्यंत वाढणार आहे. साखर कारखाना मालक प्रतिनिधी, साखर कारखाना कामगार संघटना प्रतिनिधी आणि राज्य सरकार प्रतिनिधी यांच्या त्रिपक्षीय समितीने वेतनवाढीचा बुधवारी निर्णय घेतला.