Sugar Prices Drop By 1500 Rupees In One Week From Record 6400 As Government Steps Curb Hoarding And Ensure Supply
sakal
-संतोष शेंडकर
सोमेश्वरनगर : साखरेच्या दरावर आलेली कृत्रिम सूज एकाच आठवड्यात ओसरली आहे. ६४०० रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचलेले दर सुमारे १५०० रुपयांनी घसरले आहेत. कारखान्यांना गुरुवारी (ता. २७) साखरेचा ४८०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल असा रास्त दर मिळाला. यामुळे साखरेचा तुटवडा नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.