esakal | आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये साखरेचे दर वाढणार- प्रशांत काटे IPune
sakal

बोलून बातमी शोधा

प्रशांत काटे

आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये साखरेचे दर वाढणार : प्रशांत काटे

sakal_logo
By
राजकुमार थोरात : सकाळ वृत्तसेवा

वालचंदनगर : आगामी वर्षामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये साखरेचे दर वाढणार असुन साखर निर्यातीसाठी मोठी संधी मिळणार असून साखर उद्योगाला सुगीचे दिवस येणार आहेत. छत्रपती सहकारी साखर कारखान्याने २०२०-२१ आर्थिक वर्षामध्ये ९ लाख ७१ हजार ३८० क्विंटल साखरेची निर्यात केल्यामुळे पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे २३२.७५ कोटी साखर तारण कर्ज कमी झाले असून साखर निर्यातीमुळे व्याजाचा भुर्दंड कमी झाला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी दिली.

भवानीनगर (ता.इंदापूर) श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची सन २०२०-२१ काळातील ६३ वी वार्षिक साधारण सभा ऑनालाईन पार पडली.यावेळी कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक उपाध्यक्ष अमोल पाटील,अमरसिंह घोलप,कार्यकारी संचालक अशोक जाधव उपस्थित होते. यावेळी काटे यांनी सांगितले की, ब्राझीलमध्ये नैसर्गिक आप्तीमुळे तसेच थायलंड मध्ये ही साखर उत्पादनामध्ये घट होण्याचा अंदाज आहे. साखरेचे उत्पादन व मागणी मध्ये फरक राहणार असून याचा फायदा महाराष्ट्रातील साखर कारखान्याला होणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये साखरेला चांगले दर मिळण्याची शक्यता असून कच्ची साखर निर्यातीला संधी मिळणार आहे. सध्या साखरेला प्रतिक्विंटल ३१०० रुपयापेक्षा जास्त दर मिळत आहे .

हेही वाचा: शिक्षकांना भविष्य निर्वाह निधीतील हक्काची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा

कारखान्याने ९ लाख ७१ हजार ३८० क्विंटल साखरेची निर्यात केल्यामुळे जिल्हा बॅंकेचे ३२९ कोटी रुपयांचे साखर तारण कर्ज ९६ कोटी २५ लाख रुपयावरती आले असून व्याजाचा भुर्दंड कमी झाला. छत्रपती कारखान्याने मागील गळीत हंगामामध्ये १५२ दिवसामध्ये ९ लाख १२ हजार ७१ मेट्रीक टन उसाचे गाळप केले असून ९ लाख ९४ हजार १७० क्विंटल साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. रिकव्हरी मध्ये ०.४५ टक्यांनी वाढ झाली असून रिकव्हरी १०.९० झाली असल्यामुळे चालू वर्षीच्या एफआरपीमध्ये ही वाढ होणार आहे. तसेच सहजवीज निर्मितीच्या प्रकल्पातून ४ कोटी ७० लाख ४७ हजार ७०० युनिटसची वीज निर्मिती झाली आहे.चालू वर्षीच्या गळीत हंगामामध्ये ३२ हजार २५१ एकर उस गाळपास उपलब्ध असून सुमारे ९ लाख ५० हजार मेट्रीक टन कार्यक्षेत्रातील व गेटकेनचे अडीच लाख असा १२ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप करण्याचे उद्ष्ठि ठेवले आहे. ऑनलाईन सभेमध्ये कामगार नेते युवराज रणवरे, सतिश काटे, भाऊसाहेब सपकळ, विशाल निंबाळकर,तानाजी थोरात,पांडुरंग कचरे,विक्रमसिंह निंबाळकर,प्रशांत पवार यांच्यासह अनेकांनी मते व्यक्त केली.

उसाची एफआरपीची रक्कम एका टप्यात द्यावी : जाचक

यावेळी साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी सांगितले शासानाने उसाची एफआरपीची रक्कम तीन टप्यामध्ये देण्यासंदर्भात निर्णय झाला आहे.मात्र छत्रपतीने उसाची एफआरपीची रक्कम एकाच टप्यामध्ये द्यावी. तसेच जाचक यांनी सांगितले की ,सोमेश्‍वर कारखान्याच्या परीसरातील उस गाळप केल्यामुळे छत्रपती कारखान्याचा फायदा झाला आहे. कारखान्याचे ५० टक्के सभासद कारखान्याला उस घालत नाहीत.नव्याने करण्यात आलेल्या कामगार व कर्मचारी भरतीमधील सर्व उमेदवारांची शैक्षणीक प्रमाणपत्राची तपासणी करावीत.ऑडीटर चांगले नेमावेत अशी मागणी केली.

loading image
go to top