कर्मयोगी कारखान्याचे ३ लाख मे. टन ऊस गाळप पूर्ण - हर्षवर्धन पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Karmyogi Sugar Factory
कर्मयोगी कारखान्याचे ३ लाख मे. टन ऊस गाळप पूर्ण - हर्षवर्धन पाटील

कर्मयोगी कारखान्याचे ३ लाख मे. टन ऊस गाळप पूर्ण - हर्षवर्धन पाटील

इंदापूर - महात्मा फुलेनगर (बिजवडी) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याने (Sugar Factory) सन २०२१-२२ च्या गळीत हंगामात दि. २१ डिसेंबर अखेर ३ लाख २१ हजार मे. टन ऊसाचे गाळप (Sugarcane Sifting) पुर्ण केले असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) व उपाध्यक्ष भरत शहा यांनी दिली.

श्री. पाटील पुढे म्हणाले,कर्मयोगी कारखाना चालू गळीत हंगामात दररोज प्रति दिन सरासरी ९ हजार मे. टना हुन अधिक क्षमतेने ऊसाचे गाळप करत असून ऊस गाळपाचा ३ लाख मे. टनाचा महत्वाचा टप्पा कारखान्याने पार केला आहे. त्याबद्दल कारखान्याचे संचालक मंडळ, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस वाहतूक कंत्राटदार, मुकादम, तोडणी मजूर, अधिकारी, कर्मचारी हे कौतुकास पात्र आहेत. कर्मयोगी चे सहवीज निर्मिती, इथेनॉल आदी उपपदार्थ निर्मिती प्रकल्प पुर्ण क्षमतेने सुरू असून कारखान्याने चालू हंगामात गाळप ऊसास प्रतिटन २५०० पेक्षा अधिकचा दर जाहीर करत शेतकऱ्यांना पहिला हप्ता प्रतिटन २१०० प्रमाणे अदा केला जात आहे. कारखान्याच्या सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्पातून उत्पादित सेंद्रिय खतांच्या बॅगची विक्री सुरु आहे. शेतकऱ्यांच्या सोयी साठी गाळपास आलेल्या ऊसावर उधारीने सेंद्रिय खत दिले जात आहे.

हेही वाचा: TET Exam प्रकरणातले तुकाराम सुपे आहेत तरी कोण?;पाहा व्हिडिओ

उपाध्यक्ष भरत शहा म्हणाले, कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी कारखानाकार्य क्षेत्रात ऊस उत्पादकांशी गटनिहाय साधलेल्या संवाद बैठकांचा सकारात्मक परिणाम दिसत असून, कर्मयोगी कारखान्याकडे ऊस देण्या साठी शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

यावेळी कारखान्याचे संचालक हनुमंत जाधव ,शांतीलाल शिंदे, रवींद्र सरडे,छगन भोंगळे, प्रदीप पाटील, राहुल जाधव, अंबादास शिंगाडे, पराग जाधव, विश्वास देवकाते, निवृत्ती गायकवाड, भूषण काळे, प्रवीण देवकर, रतन देवकर, केशव दुर्गे, सतीश व्यवहारे, हिरा पारेकर, वसंत मोहोळकर, शारदा पवार, कांचन कदम, कार्यकारी संचालक देवराव लोकरे उपस्थित होते.

Web Title: Sugarcane 3 Lakh Metric Tonnes Karmayogi Sugar Factory Sifting Complete Harshwardhan Patil

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top