.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
माळेगाव : `शेतकऱ्यांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता त्यांना शेतीशी निगडित पूरक व्यवसाय करण्यास प्रोत्साहन देणे, मदतीसाठी मार्गदर्शन करणे, तसेच तंत्रज्ञान, अनुदान शासनस्तरावर उपलब्ध करून दिल्यास महाराष्ट्रात शेतकरी प्रोड्यूसर कंपन्या व्यवसायात यशस्वी होऊ शकतात. त्याचे उत्तम उदाहरण खामगळवाडी (ता. बारामती) येथील जोगेश्वरी किसान समृद्धी प्रोड्यूसर कंपनीने गूळ निर्मिती कारखान्याच्या माध्यमातून पुढे आणले आहे,` असे प्रतिपादन मुंबई दुरदर्शन केंद्राचे कार्य़क्रम अधिकारी भारत हरणखुरे यांनी केले.