Raju Shetty : थकीत एफआरपी दिली नाही तर शेतकऱ्यांना घेऊन येणार; राजू शेट्टी यांचा इशारा

राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी डिसेंबरनंतर शेतकऱ्यांचे पैसेच दिलेले नाहीत. शेतकरी हेलपाटे मारत आहेत.
Former MP Raju Shetty
Former MP Raju Shettysakal
Updated on

पुणे - ‘उच्च न्यायालयाने एक रकमी रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) देण्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्‍याने एफआरपी देण्याचा राज्यशासनाचा निर्णय रद्द झाला. राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी डिसेंबरनंतर शेतकऱ्यांचे पैसेच दिलेले नाहीत. शेतकरी हेलपाटे मारत आहेत. त्यांना विलंब आकारानुसार व्याज दिले पाहिजे.

थकीत एफआरपी जवळपास सात हजार कोटी आहे. थकीत एफआरपी आठ दिवसांमध्ये मिळाली नाही तर शेतकऱ्यांना घेऊन साखर आयुक्तालयात येऊ आणि मग तेव्हा सर्व रक्कम व्याजासह वसूल केल्यानंतरच जाऊ,’ असा इशारा शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी (ता.२५) यांनी मंगळवारी दिला.

पुण्यात साखर आयुक्त सिद्धराम सालीमठ यांना थकीत एफआरपीच्याबाबतीत निवेदन दिल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शेट्टी बोलत होते. यावेळी राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, ॲड. योगेश पांडे, पुणे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर आदी उपस्थित होते.

शेट्टी म्हणाले, ‘साखर आयुक्तांना भेटल्यानंतर माहिती समजली की दोन हजार ३०० कोटींची थकबाकी आहे परंतु, ही अर्धवट माहिती आहे जवळपास सात हजार कोटींची थकबाकी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची राहिली आहे. साखर आयुक्तांच्या निर्णयाची आठ दिवस वाट बघणार आहोत.

तसेच २०१९ पासून अनेक कारखान्यांनी महसूल विभागणी उत्पन्नाचा (आरएसएफ)चा हिशोब दिलेला नाही. पाच वर्षे साखर कारखाना हिशोब देत नसतील तर याठिकाणी बसणारे अधिकारी काय करत आहेत? का त्यांच्याकडून हिशोब घेतला नाही?

शेतकऱ्यांचे पैसे एवढ्या दिवस त्यांना वापरण्यासाठी परवानगी का दिली? ऊस दर नियंत्रण समितीची बैठकही होत नाही. बैठक घेण्यासही वेळ नाही. समिती झाल्यानंतर पंधरा महिने बैठक होत नसतील तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कशी वागणूक दिले जात आहे ते यावरून दिसते.’

वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी माणसे पेरली गेली...

‘मुख्यमंत्री म्हणतात कोरटकर चिल्लर माणूस आहे, तर हा चिल्लर माणूस एक महिना का सापडत नव्हता? अशी माणसे वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी पेरली गेली आहेत. आज ज्वलंत प्रश्नांकडे पाहिले जात नाही, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी मिळत नाही, सोयाबीन खरेदी केले जात नाही, शेतकरी आत्महत्या करत आहेत, दंगली घडत आहेत, महिला सुरक्षित नाहीत हे नागरिकांचे प्रश्न आहेत.

परंतु, नागरिकांना भलतीकडेच वळविण्यासाठी संवदेनशील विषयाला स्पर्श करून लोकांची माथी भडकवायची आणि आपले अपयश लपवायचे हेच याच्या पाठीमागचे कारण आहे,’ असेही शेट्टी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com