Pune : ऊस दर २८०० रुपये प्रती मेट्रीक टन जाहीर

भीमाशंकरकडून मागील सन २०२१-२२ हंगामासाठी अंतिम ऊस दर
Dilip Walse Patil
Dilip Walse Patilsakal
Summary

भीमाशंकरकडून मागील सन २०२१-२२ हंगामासाठी अंतिम ऊस दर

पारगाव : दत्तात्रयनगर ( पारगाव) ता. आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने संस्थापक-संचालक ,माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार मागील सन २०२१-२२ गाळप हंगामात गाळप केलेल्या ऊसासाठी अंतिम ऊस दर २८०० रुपये प्रती मेट्रीक टन जाहीर केला असल्याची माहीती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२१-२२ गाळप हंगामात कार्यक्षेत्र व परिसरातील गाळप केलेल्या संपूर्ण ११ लाख ८६ हजार ४२६ मेट्रीक टनासाठी कारखान्याने यापुर्वी एफ.आर.पी. नुसार २६४२ रुपये प्रती मेट्रीक टनाप्रमाणे होणारी रक्कम एक रकमी ऊस उत्पादकांना अदा केलेली आहे.

उर्वरित अंतिम हप्ता १५८ रुपये प्रती मेट्रीक टनामधून भीमाशंकर शिक्षण संस्था निधी आठ रुपये प्रती मेट्रीक टन वजा जाता शिल्लक १५० रुपये प्रती मेट्रीक टनाप्रमाणे होणारी एकूण रक्कम १७ कोटी ८० लाख ऊस उत्पादकांचे बँक खात्यावर गुरुवार दि. २० ऑक्टोबर रोजी वर्ग करण्यात येणार आहे.

दिलीप वळसे पाटील यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत तसेच बॉयलर अग्निप्रदीपन व गव्हाण पूजन कार्यक्रमात दिलेल्या शब्दाप्रमाणे ऊस उत्पादकांची दिवाळी गोड केली आहे. इतर कारखान्यांच्या तुलनेत डिस्टीलरी प्रकल्प नसतानाही चांगला ऊस दर दिल्यामुळे ऊस उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

कारखान्याने एफ.आर.पी.ची रक्कम वेळेत तर दिलेलीच आहे त्याशिवाय एफ.आर.पी. पेक्षा जास्त रक्कम अंतिम हप्त्याचे स्वरुपात शेतक-यांना अदा करण्याचे निश्चित केले आहे. गाळप हंगाम २०२२-२३ करीता कार्यक्षेत्र व परिसरातील सर्व ऊस उत्पादकांनी भीमाशंकर कारखान्यास आपला ऊस देवून पुर्वीप्रमाणेच सहकार्याची भावना ठेवावी असे आवाहन श्री. बेंडे यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com