पावसामुळे ऊस संबंधित प्रश्न ऐरणीवर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

पाऊस पडल्याने तोडणीवर परिणाम होऊ देणार नाही.कारखाना परिसरातही पाऊस झाल्याने कामकाजात वाढ झाली असली तरी नियोजनानुसार हंगाम पूर्ण होईल. दरम्यान कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऊसतोडणीच्या कामावर विपरीत परिणाम होत आहे. याशिवाय पोलिसांच्या कारवाईमुळे ऊस वाहतूक विस्कळीत झाली आहे.
- श्री.एस.जी. पठारे, (कार्यकारी संचालक - संत तुकाराम सहकारी कारखाना, कासारसाई)

करंजगाव - बुधवारी (दि. २५) रोजी नाणे मावळात जोरदारपणे अवकाळी पाऊस पडला. याचा परिणाम विविध पिकांवर तर झालाच परंतु ऊस संबंधित प्रश्न ऐरणीवर आहेत. यात प्रामुख्याने ऊसतोड कामगारांचे हाल झाले. त्यांच्या झोपड्या व जनावरे ओलिचिंब भिजल्याने गारठली. तसेच मार्च अखेरही ऊसतोडणी हंगाम संपला नाही.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जानेवारी-फेब्रुवारी महिन्याच्या तारखा होऊनही अजून ऊस तसाच शेतात उभा आहे. हे काम पावसामुळे आता आणखीन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.याबाबत बोलताना नाणेचे शेतकरी यतिराज नाणेकर म्हणाले, 'पावसामुळे लांबलेली ऊस तोडणी आणखीनच उशिरा झाल्यावर खोडव्याच्या ऊसाची मशागत योग्य प्रकारे करता येणार नाही. म्हणजेच पुढच्या हंगामाच्या उत्पन्नांवरही याचा विपरीत परिणाम होणार आहे'.

पाऊस पडल्याने तोडणीवर परिणाम होऊ देणार नाही.कारखाना परिसरातही पाऊस झाल्याने कामकाजात वाढ झाली असली तरी नियोजनानुसार हंगाम पूर्ण होईल. दरम्यान कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऊसतोडणीच्या कामावर विपरीत परिणाम होत आहे. याशिवाय पोलिसांच्या कारवाईमुळे ऊस वाहतूक विस्कळीत झाली आहे.
- श्री.एस.जी. पठारे, (कार्यकारी संचालक - संत तुकाराम सहकारी कारखाना, कासारसाई)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sugarcane problem by rain