DCM Sunetra Pawar
sakal
माळेगाव - माळेगाव कारखान्याचा ७० व्या ( २०२६ -२७ ) ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते झाला. यंदाचा गळीत हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून, कारखान्याने १२ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. यंदा कमी पर्जन्यमानामुळे उसाच्या उत्पादनात १५ ते २० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे, अशी चिंता श्रीमती पवार यांनी यावेळी व्यक्त केली.