esakal | Pune : राज्यात यंदा विक्रमी ऊस गाळप होणार
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Pune : राज्यात यंदा विक्रमी ऊस गाळप होणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्राच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच उसाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले असून, एक हजार ९६ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होणार आहे. त्या दृष्टीने साखर कारखाने आणि आयुक्तालयाकडून ऊस गाळपाचे नियोजन करण्यात येत आहे.

राज्यात आत्तापर्यंत सर्वाधिक १२.३४ लाख हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली आहे. गूळ आणि बेण्यांसाठी वापरण्यात येणारा दहा टक्के ऊस वगळता एक हजार ९६ लाख मेट्रिक टन ऊस साखर कारखान्यांना गाळपासाठी उपलब्ध होणार आहे. सरासरी साखर उतारा ११.३० टक्के ग्राह्य धरल्यास येत्या गाळप हंगामात १२२ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन होणार आहे. परंतु इथेनॉल निर्मितीमुळे एकूण उत्पादनाच्या तुलनेत सुमारे दहा लाख टन साखरेचे उत्पादन कमी होईल. त्यामुळे यंदाच्या हंगामात ११२ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन होणार असल्याची माहिती साखर आयुक्तालयाकडून देण्यात आली.

मागील हंगामात १९० साखर कारखान्यांनी उसाचे गाळप केले होते. त्यामध्ये ९५ खासगी आणि ९५ सहकारी साखर कारखान्यांचा समावेश होता. या वर्षी सुमारे १९५ साखर कारखान्यांकडून उसाचे गाळप करण्यात येणार आहे. त्यामध्ये खासगी साखर कारखान्याची संख्या शंभराच्या जवळपास आहे.

राज्यात यंदा विक्रमी उसाचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे या वर्षी इथेनॉल वगळता ११२ लाख मेट्रिक टन साखर उत्पादित होईल, असा अंदाज आहे. ऊस गाळपाच्या नियोजनासाठी मंत्री समितीची बैठक घेण्याबाबत उद्या (ता. ९) निर्णय होईल.

- शेखर गायकवाड, साखर आयुक्त

loading image
go to top