Sugarcane being weighed at a sugar factory in Maharashtra.
esakal
पुणे, : राज्यातील साखर कारखान्यांनी केलेल्या उसाच्या काटामारीमुळे शेतकऱ्यांना गेल्या वर्षीच्या हंगामात किमान २६०० कोटी रुपयांचा थेट फटका बसल्याचा अंदाज आहे. शेतकऱ्यांचे सरासरी एकरी २० ते २५ हजार रुपयांचे नुकसान झालेले आहे. कारखान्यांकडून उसाच्या वजनात ७ ते १० टक्क्यांपर्यंत काटामारी केली जाते, अशी माहिती या क्षेत्रातील तज्ज्ञ, अभ्यासक आणि विश्लेषकांनी दिली.
काटामारीतून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची राजरोस झालेली लूट ‘एफआरपी’तील वाढीपेक्षाही अधिक आहे;