Sugarcane Workers: ऐन दिवाळीतही ऊसतोड मजुरांच्या हातात कोयता; पोटाची खळगी भरण्यासाठी जीव धोक्यात घालून कष्ट

Sugarcane Workers : दिवाळीच्या सणातही जुन्नर तालुक्यातील आळेफाटा परिसरात ऊसतोड मजूर कोयता चालवत आहेत. बिबट्याच्या भीतीच्या सावटाखाली ताडपत्रीच्या झोपड्यांत संसार थाटून हे कुटुंब जीव धोक्यात घालून उदरनिर्वाहासाठी कष्ट करत आहेत.
Sugarcane workers continue harvesting in the Alephata area of Junnar during Diwali.

Sugarcane workers continue harvesting in the Alephata area of Junnar during Diwali.

esakal

Updated on: 

राजेश कणसे

आळेफाटा: बिबट्याच्या भीतीच्या सावटाखाली ऊसाच्या फडात संसार; ताडपत्रीच्या झोपड्यांत उघड्यावरच मुक्काम

साखर कारखाने सुरू झाल्याने ऊसतोड मजुरांचे जुन्नर तालुक्यात आगमन झाले आहे. दिवाळीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही अनेक ऊसतोड मजूर उसाच्या फडात कोयता चालवत असल्याचे चित्र तालुक्याच्या पूर्व भागातील आळेफाटा परिसरात पाहायला मिळाले. पोटाची खळगी भरण्यासाठी या मजुरांना सणासुदीच्या दिवशीही कष्ट करावे लागत आहेत.

Loading content, please wait...