Vidhan Sabha 2019 : मनसेचे सुहास निम्हण यांनी भरला उमेदवारी अर्ज

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 October 2019

शिवाजीनगर मतदार संघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून सुहास निम्हण यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी अस्मीता मोरे यांच्याकडे दाखल केला. यावेळी शिवाजीनगर मतदार संघातील मनसेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

औंध (पुणे) : शिवाजीनगर मतदार संघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून सुहास निम्हण यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी अस्मीता मोरे यांच्याकडे दाखल केला. यावेळी शिवाजीनगर मतदार संघातील मनसेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

तत्पुर्वी जंगली महाराज मंदिरात दर्नश घेऊन येथून पदयात्रा काढण्यात आली. जंगली महाराज रस्त्यावर वाहतुक कोंडी होऊ नये व प्रदूषण टाळावे यासाठी निवडणूक निर्णय अधिका-यांच्या कार्यालयापर्यंत पदयात्रा काढण्यात आली.

यापुर्वी भाजपचे सिध्दार्थ शिरोळे, काँग्रेसचे दत्ता बहिरट यांनी अर्ज भरले आहेत. निम्हण यांच्या उमेदवारीने शिवाजीनगर मध्ये तिरंगी लढत होणार असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसचे इच्छूक उमेदवार मनिष आनंद यांना तिकीट नाकारल्याने ते नाराज होते परंतु, त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. भाजपच्या शिरोळे यांना असलेला अंतर्गत विरोध मतदारांत असलेली नाराजी यामुळे या दोघांना मागे सारून मनसेचे इंजीन जोरात धावणार का अशी जोरदार चर्चा मतदारांत सुरू आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suhas Nimhan filed his nomination In Shivajinagar constituency