मृत्यूस डीएस कुलकर्णी जबाबदार.. म्हणत पुण्यात ठेवीदाराची आत्महत्या

Untitled-3.gif
Untitled-3.gif

पुणे : डीएसके अर्थात डीएस कुलकर्णी यांच्या एका ठेवीदाराने आत्महत्या केली आहे. तानाजी गणपत कोरके (वय-60) असे या ठेवीदाराचे नाव होते. तानाजी कोरके हे पुण्यातील घोरपडी येथील भीमनगर परिसरात राहात होते.

त्यांनी मुलीच्या लग्नासाठी डीएसकेमध्ये गुंतवणूक केली होती. मात्र, गुंतवणूक केलेली रक्कम मिळत नसल्याने तानाजी यांनी आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलून आयुष्य संपवले आहे. तानाजी कोकरे शिवसैनिक होते. तानाजी यांचे एक पत्र सापडले असून त्यावर शेवटी शिवसैनिक....जय महाराष्ट्र! असा उल्लेख आहे. कोरके यांच्या पश्चात चार मुली आहेत.

तानाजी कोकरे यांनी 2014 मध्ये आपल्या दोन मुलींच्या लग्नासाठी स्वतःच्या नावे चार लाख तर नातवंडांच्या शिक्षणासाठी जावयाच्या नावे पन्नास हजार रुपये रक्कम डीएसके डेव्हलपर्स यांच्याकडे गुंतवणूक केली होती. 2017 मध्ये त्याची मुदत संपल्यावर रकमेसाठी अनेकदा पाठपुरावा केला. तिसऱ्या मुलीचे लग्न पाहुण्यांकडून उसणे पैसे घेऊन केले. मात्र, चौथ्या मुलीचे लग्नासाठी पैसे कोठून आणायचे? अशी चिंता कोकरे यांना सतावत होती. या चिंतेतून आपण आयुष्य संपवत असल्याचे कोकरे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.

पत्रात डीएस कुलकर्णी यांचा उल्लेख- माझ्या मृत्यूनंतर आत्महत्येस डीएस कुलकर्णी यांना जबाबदार धरून पोलीस खात्याने किमान माझ्या कुटुंबियांना तरी पैसे मिळवून द्यावेत. माझ्या आत्महत्येनंतर तरी किमान हे पैसे मिळून माझे वारस मुलीचे लग्न करतील, तेव्हा माझ्या आत्म्यास शांती लाभेल.' अशी विनंती तानाजी कोकरे यांनी पत्रातून केली आहे. पत्रात शेवटी आपले पैसे परत मिळावेत अन्यथा माझ्या कुटूंबियांवर देखील ही वेळ येईल. असेही कोकरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, घराला घरपण देणारी माणसं, असे ब्रिद मिरवणाऱ्या डीएसके ग्रुपने ज्यादा व्याजाचे अमिष दाखवून राज्यातील हजारो ठेवीदारांकडून मोठ्या प्रमाणावर ठेवी मिळवल्या होत्या. सुरुवातीला ठरल्याप्रमाणे व्याज दिल्यानंतर आता व्याजही नाही आणि मुद्दलही नाही, अशी स्थिती आल्याने ठेवीदार हवालदिल झाले आहेत. हजारो ठेवीदारांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दिली आहे. या प्रकरणी डीएसके व त्यांची पत्नी, मुलगा यांना अटक झाली आहे. ते सध्या तुरुंगात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com