कोरोनाची भिती एवढी की त्यांनी...

corona.jpg
corona.jpg

घोरपडी : जगभर कोरोनाने थैमान घातले असताना पुण्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. जून महिन्यात घोरपडीमधील कोरोनाबाधित रुग्णाचा आकडा वाढत असून, आपल्या मुलांना कोरोना झाला नसेल ना या धास्तीने भीमनगर येथे एका व्यक्तीने राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

बळीराम जाधव रा. भीमनगर (वय ५५) यांनी बुधवारी संध्याकाळी घरात गळफास लावून आत्महत्या केली. मागील आठवड्यापासून भीमनगर येथे रुग्ण वाढत आहेत.  सर्व वस्तीत रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तीची चाचणी सुरू केली आहे. चाचणी केलेल्या व्यक्ती पैकी ३० ते ४० टक्के नागरिक यामुळे बाधित असल्याचे आढळले आहे.

दरम्यान, यामुळे वस्तीतील रोज शंभर लोकांची चाचणी केली जात आहे. बुधवारी बळीराम जाधव यांच्या मुलांची चाचणी करण्यात आली. त्यानुसार अहवाल येईपर्यंत त्यांना ढोले पाटील रस्ता येथील महात्मा फुले शाळेत क्वारंटाईन करण्यात आले आहे. आमचा अहवाल आल्यावर तुमची चाचणी करूया असा निरोप देत त्यांची मुले चाचणीसाठी गेल्यावर ही घटना घडली आहे. 

वस्तीत अनेक कुटुंबांना कोरोना झाला आहे, आपल्याला पण होईल आणि आपल्या मुलांना पण झाला तर काय करायचे या धास्तीने त्यांनी आत्महत्या केली असावी अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

संध्याकाळी त्यांची पत्नी घरात आल्यावर पतीने आत्महत्या केल्याचे तिने पाहिले. शेजाऱ्यांना मदतीसाठी बोलवले पण कोरोनाच्या भीतीने कोणी पुढे आले नाही. अर्ध्या तासानंतर पोलिस आल्यावर त्यांना ससून रुग्णालयात नेले. तोपर्यंत त्यांचे हृदय चालू होते. उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. 

परिसरात वाढत जाणारे रुग्ण यामुळे अनेक नागरिकांमध्ये कोरोनाची भीती निर्माण झाली आहे. कुठलेही लक्षण नसताना अहवाल सकारात्मक येत असल्याने नागरिक चिंतेत आहेत. त्यामुळे अशा काही घटना घडत असल्याचे समोर येत आहे. 

बळीराम जाधव यांना पत्नी, दोन मुले, सूना आणि तीन नातवंड असा मोठा परिवार आहे. मुलांवर व नातवंड यांच्यावर खूप प्रेम होते. कोरोनाच्या भीतीने त्यांच्या सूना व नातवंड गावाला गेले आहेत. फक्त दोन मुले आणि पती पत्नी घरात राहत होते. बुधवारी मुले ही तपासणीसाठी गेल्यावर घरात एकटे वाटत होते. कोरोना झाला तर आपले काय होईल अशी धास्ती निर्माण झाल्याने त्यांनी आत्महत्या केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com