

सत्ताधाऱ्यांचे राजकारण दबाव अन् फोडाफोडीचे
वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांचा थेट हल्लाबोल
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १० : राज्यातील सध्याचे राजकीय वातावरण आणि सत्ताधारी पक्षांच्या कारभारावर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी जोरदार घणाघात केला आहे. सत्ताधारी भाजपकडून विरोधकांवर दबाव आणणे, संघटनांमध्ये फूट पाडणे आणि जाती-धर्माचे राजकारण खेळून सर्वसामान्य जनतेचे मूलभूत प्रश्न बाजूला सारणे, हीच त्यांची कार्यपद्धती बनली असल्याचा गंभीर आरोप सुजात आंबेडकर यांनी केला. शासकीय विश्रामगृहातील पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध सामाजिक व राजकीय मुद्द्यांवर आपली परखड भूमिका मांडली.
यावेळी आंबेडकर म्हणाले की, राज्यातील जनता आज वाढती महागाई, बेरोजगारी, शिक्षण आणि आरोग्याच्या बिकट समस्यांनी त्रस्त आहे. मात्र, या मूलभूत प्रश्नांवर तोडगा काढण्याऐवजी सत्ताधारी पक्ष केवळ राजकीय कुरघोडी आणि स्वार्थाचे राजकारण करण्यात व्यस्त आहेत. विरोधकांना नाहक अडचणीत आणण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब केला जात असून, लोकशाहीच्या तत्त्वांना हरताळ फासला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वंचित बहुजन आघाडी आगामी निवडणुकांमध्ये सर्वसामान्य, शोषित, दलित, बहुजन आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, राज्यात पारदर्शक आणि सर्वसमावेशक विकासाचा अजेंडा राबवण्याची गरज त्यांनी प्रतिपादन केली.
जनतेने अशा फोडाफोडीच्या व दबावाच्या राजकारणाला बळी न पडता आपल्या हक्कासाठी सक्षम पर्यायाच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन सुजात आंबेडकर यांनी या पत्रकार परिषदेत केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.