
'कर्जत-जामखेड तालुक्यातील एक तरी सरकारी अधिकारी हसताना दिसतो का?'
'राष्ट्रीय महामार्गाचे काम आमच्यावर सोडा, किमान तुम्ही...'
मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोपप्रत्यारोप पहायला मिळत आहेत. दरम्यान, आता एक वेगळी बातमी समोर येत आहे. भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. कर्जत-जामखेड तालुक्यातील एक तरी सरकारी अधिकारी हसताना दिसतो का? त्यांच्या चेहऱ्यावर कायमच गांभीर्य असतं. तालुक्यात एक नाही तर दहा आमदार आहेत, कारण आमदारांना पीएच तेवढे आहेत असा टोला खासदार सुजय विखेंनी आमदार रोहित पवारांना लगावला आहे. कर्जत तालुक्यातील शिरपूर खासदार विखे बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीवर टीका केली.
हेही वाचा: राज ठाकरेंचा अयोध्या दौरा; मनसेच्या गोटात घडामोडींना वेग
तालुक्यात कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांवर आमदारांकडून दबावतंत्र सुरु असल्याचा आरोप करताना विखे पाटील म्हणाले, मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते कर्जतमधील सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहाचे उद्घाटन करण्यात आले. या कामाची मंजुरी माजी मंत्री राम शिंदे यांनी दिली. निधीही त्यांनीच आणला. पण नारळ फोडण्यासाठी भलतेच लोक गोळा झाले. आमदार राष्ट्रीय महामार्गाची पाहणी करुन त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात. मिरजगावमधील रस्त्याची दुरवस्था पाहावी. राष्ट्रीय महामार्गाचे काम आमच्यावर सोडा, तुम्ही आणलेल्या निधीतील रस्ता तरी पूर्ण करा, टोलाही त्यांनी लगावला आहे.
पुढे ते म्हणाले, कोणत्याही कार्यकर्त्याला कोणाचे नेतृत्व स्वीकारावे याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र कार्यकर्त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये दबाव तंत्राने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घडवला जाणे अयोग्य आहे. आमच्या संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य संघर्षात गेले. मात्र आम्ही कधी सुडबुद्धीने कोणावर कारवाई केली नाही. एखाद्या पक्षातील कार्यकर्त्यांना दबाव तंत्र वापरून स्वतःचा पक्ष वाढवत असाल तर याला कर्जत-जामखेडच्या जनतेला उत्तर द्यावेच लागेल असेही विखे पाटील यावेळी म्हणाले. त्यांनी सातत्याने बोलताना पवार घराण्यावर टीका केली आहे. त्यामुळे आता यावर रोहित पवार काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा: ''किरीट का कमाल'', संजय राऊतांचे सोमय्यांवर पुन्हा गंभीर आरोप
Web Title: Sujay Vikhe Patil Criticized To Rohit Pawar On National Highway Working In Karjat
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..