
राज ठाकरेंचा अयोध्या दौरा; मनसेच्या गोटात घडामोडींना वेग
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्याचं नियोजन करण्यासाठीची खलबतं आता सुरू झाली आहेत. त्यासाठी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक शिवतीर्थावर होणार आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत्या ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सध्या वादविवादांना उधाण आलं आहे. अयोध्येतल्या भाजपा नेत्यानेच त्यांच्या या दौऱ्याला विरोध केला आहे. राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी तरच त्यांनी अयोध्येत यावं, अशी मागणी या नेत्याने केली आहे.
हेही वाचा: शिवसेना-मनसे वाद चिघळला; राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी सेनेची पोस्टरबाजी
तर शिवसेनाही या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आक्रमक झाली आहे. अयोध्येत शिवसेनेने जोरदार पोस्टरबाजी करत राज ठाकरेंना टोला लगावला आहे. राज ठाकरेंच्या दौऱ्यानंतर लगेचच पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे हेही अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर अयोध्येत शिवसेनेने 'असली आ रहे है, नकली से सावधान' असे पोस्टर्स लावले आहेत.
हेही वाचा: राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला भाजपचाच विरोध, प्रवीण दरेकर म्हणाले...
दरम्यान, राज ठाकरेंच्या या दौऱ्याच्या अनुषंगाने मनसे पदाधिकारी राज यांच्या मुंबईतल्या शिवतीर्थ या निवासस्थानी जमणार आहेत. या बैठकीमध्ये अयोध्या दौऱ्याचा आढावा घेतला जाईल, तसंच परिस्थितीवर चर्चाही होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Web Title: Raj Thackeray Ayodhya Visit Maharashtra Navnirman Sena
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..