esakal | स्वारगेट व सारसबाग येथे रविवारी वाहतुकीत बदल
sakal

बोलून बातमी शोधा

Swargate

स्वारगेट व सारसबाग येथे रविवारी वाहतुकीत बदल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या पार्श्‍वभुमीवर स्वारगेट (Swargate) येथील जेधे चौक व सारसबाग (Sarasbaug) परिसरात वाहतुकीत बदल (Traffic Changes) करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतुक शाखेतर्फे करण्यात आले आहे. (Sunday Traffic Changes at Swargate and Sarasbaug)

जेधे चौकातुन सारसबाग चौकाकडे जाण्यासाठी वाहनांना रस्ता बंद असेल. वाहनचालकांनी जेधे चौकाकडून सिंहगड रोडला जाण्यासाठी व्होल्गा चौक, मित्रमंडळ चौक,सावरकर चौक मार्गे सिंहगड रस्त्याने जावे. जेधे चौकातील उड्डाणपुलावरुन (वायजंक्‍शन) सारसबागेकडे वाहनांना जाण्यास प्रवेश बंद केला आहे. कात्रजकडून सारसबागकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी उड्डाणपुलावरुन न जाता लक्ष्मीनारायण (व्होल्गा चौक) चौकातुन डावीकडे वळून इच्छितस्थळी जावे.

हेही वाचा: पुणे : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

वेगासेंटर ते सारसबागपर्यंत ग्रेडसेप्रेटरमधून वाहनांना जाण्यास बंदी असेल. वेगा सेंटरपासून घोरपडी पेठ उद्यान, राष्ट्रभुषण चौकापासून हिराबाग चौकाकडे जावे. पुरम चौक ते जेधे चौक या रस्त्यावरील एकेरी मार्गात वाहनांना आवश्‍यकतेनुसार दुपारी तीन वाजल्यापासून ते रात्री 12 पर्यंत शिथीलता देऊन दुहेरी प्रवेश देण्यता येईल, असे वाहतुक शाखेच्यावतीने कळविण्यात येणार आहे.

'स्वारगेट ते सारसबाग परिसरात नागरीकांची गर्दी होऊ नये, यादृष्टीने तेथे पोलिस अधिकारी व कर्मचारी काळजी घेतली. त्याचबरोबर वाहतुक सुरळीत राहील, यादृष्टीनेही वाहतुक शाखेकडून प्रयत्न केले जातील.'

- डॉ. रवींद्र शिसवे, पोलिस सहआयुक्त.

loading image
go to top