

Maharashtra Government Focuses on Tribal Development and Cultural Heritage Says Deputy Chief Minister Sunetra Pawar at Ghodegaon
esakal
घोडेगाव : क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आयोजित जनजातीय गौरव दिनाच्या माध्यमातून आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, संस्कृती, परंपरा आणि स्वाभिमानाचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. आदिवासी समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासह त्यांच्या सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.