

Sunidhi Chauhan Set to Perform Live in Pune
Sakal
पुणे : ‘इश्क सुफियाना’, ‘कमली’, ‘धूम मचाले’, ‘मनवा लागे’, ‘है शोना’ अशा एकापेक्षा एक बहारदार गाण्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ‘देसी गर्ल’ म्हणजे सुनिधी चौहान. हिंदी चित्रपटसृष्टीतील या आघाडीच्या गायिकेच्या पुण्यातील मैफिलीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ‘सकाळ’ प्रस्तुत ‘सुहाना स्वास्थ्यम्’ अंतर्गत ‘सुनिधी चौहान - आय ॲम होम’ या संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. ६ डिसेंबरला सायंकाळी ७ वाजता कोथरूडच्या सूर्यकांत काकडे फार्म येथे ही भव्य मैफील होणार आहे. या मैफिलीसाठी ‘सुहाना मसाले’ हे मुख्य प्रायोजक असून विश्वकर्मा विद्यापीठ आणि भारती विद्यापीठ हे सहप्रायोजक आहेत. तसेच, व्हीटीपी रिअल्टी, सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट्स आणि सूर्यकांत काकडे व असोसिएट्स हे सहयोगी प्रायोजक आहेत.