

Suhana Swasthyam 2025
Sakal
‘‘रंगमंचावर असताना प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्याचा माझा प्रयत्न असतो. प्रत्येक प्रकारातील गाणं गायला मला तितकंच आवडतं. रसिकांच्या वेगवेगळ्या गाण्यांना मिळणाऱ्या वैविध्यपूर्ण प्रतिसादामुळे माझा उत्साह द्विगुणित होतो. त्यामुळेच रसिकांना परिपूर्ण दृकश्राव्य अनुभव देण्याची जबाबदारी असते. या कार्यक्रमातून मी तो देणार...’’ हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या गायिका सुनिधी चव्हाण सांगत होत्या. ‘सकाळ’ प्रस्तुत ‘सुहाना स्वास्थ्यम’ या महोत्सवात येत्या शनिवारी (ता. ६) चौहान यांच्या ‘सुनिधी चौहान-आय ॲम होम’ या संगीत मैफिलीचे आयोजन केले आहे. पुण्यात बऱ्याच कालावधीनंतर सादर होणाऱ्या या मैफिलीविषयी चौहान यांच्याशी साधलेला संवाद.