पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यामुळे देशाला दुसऱ्या पर्यायाची गरजच काय; सुनील देवधर

अटलबिहारी वाजपेयी स्मृती पुरस्कारप्रसंगी देवधर यांचे मनोगत
Sunil Deodhar over work of Prime Minister Narendra Modi politics pune
Sunil Deodhar over work of Prime Minister Narendra Modi politics pune
Updated on

पुणे : "श्‍यामाप्रसाद मुखर्जी, दिनदयाळ उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारख्या नेत्यांनी जनसंघाच्या, भाजपच्या तत्वांशी, मुल्यांशी कधीही तडजोड केली नाही. बहुमत असते, तर अटलबिहारी वाजपेयी यांनी 370 कलमही रद्द केले असते.

370 कलम किंवा राम मंदिराचे त्यांचे स्वप्न सत्यात उतरविण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यामुळे विरोधकांच्या हातून 2024 हि निसटले आहे. देशाला आता दुसऱ्या पर्यायाची गरज काय आहे'', असे स्पष्ट मत भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

आधार सोशल फाऊंडेशनतर्फे अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ टिळक स्मारक मंदिर येथे "अटल शक्ती पुरस्कार' प्रदान कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुनील कांबळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) पुणे महानगर कार्यवाह महेश करपे, भाजपचे संघटन सरचिटणीस राजेश पांडे,

हेमंत रासने, शैलेश टिळक, राजेंद्र हिरेमठ, आयोजक दिलीप काळोखे उपस्थित होते. पाटील व देवधर यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते उदय जगताप यांना "अटल शक्ती पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. तर शाहीर दादा पासलकर, शिल्पकार अभिजित धोंडफळे, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद देवल, सामाजिक कार्यकर्त्या नलिनी वायाळ - गावडे, ऍड.मारुती गोळे यांना "अटल साधना पुरस्कार' प्रदान करण्यात आला.

देवधर म्हणाले, ""मोदी यांनी कलम 370, राम मंदिराचा प्रश्‍न मार्गी लावला. गृहमंत्री अमित शहा यांनी 1 जाने 2024 ला राम मंदिराचे उद्‌घाटन होईल, असे सांगितल्याने विरोधकांच्या हातुन 2024 निसटले आहे. मनमोहनसिंग पंतप्रधान असताना गुहावटीतून निवडून येऊनही त्यांनी तिथे कधी मतदान केले नाही, याऊलट मोदी यांनी 55 रात्री ईशान्य भारतात मुक्काम केला आहे.

भारताचे तत्कालीन पंतप्रधान हात जोडून उभे राहायचे. पण मोदी हे जगभर फिरले, त्यांनी जे चांगले आहे, ते आपल्याकडे आणले.कोरोना कालावधीत मोदी यांनी केवळ भारतालाच नव्हे, तर संपुर्ण जगाला स्वदेशी लस, औषधांद्वारे उभारी दिली. त्यांचे काम कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोचविली पाहीजे.''

पाटील म्हणाले, ""अटल वाजपेयी यांनी केवळ देशालाच नाही, तर त्यांनी जगला दिशा दिली, त्यांनी राष्ट्राचा कायम विचार केला. शेवटच्या क्षणापर्यंत देशासाठी काम केलं. देशात कॉंग्रेस व्यतिरिक्त अनेक पंतप्रधान झाले, पण वाजपेयी यांचे पंतप्रधान म्हणून मोठे कार्य आहे. म्हणूनच त्यांच्या सारख्या तपस्वीच्या नावाने मिळालेला पुरस्कार खूप महत्वाचा आहे. उदय जगताप यांचे कार्य खूप मोठे आहे, त्यांचे काम इतरांसाठी प्रेरणादायी आहे.''

जगताप यांनी पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत, ""आम्ही शहरातील बेरोजगारी, गुन्हेगारीचे प्रश्‍न सोडविण्याबरोबरच गडचिरोलीमध्ये काम करण्यास सुरुवात केली. नक्षलवादग्रस्त 72 गावात वीज पोहोचवली. तेथील आरोग्याचे प्रश्न सोडविले. ज्यांच्या हातात बंदूक होती, त्यांच्या हातात पेन दिले. हा समाज बदल करण्याचे काम गणेशोत्सव मंडळ करत आहेत." प्रास्ताविक दिलीप काळोखे यांनी केले, तर सूत्रसंचालन घाटे यांनी केले.

शहरी नक्षलवाद शहरावर घोंगावतोय - चंद्रकांत पाटील

पुणे हे जलदगतीने विकास साधणारे शहर आहे. या शहरातील शांतता विस्कळीत करण्याचे काम केले जात आहे. शहरी नक्षलवाद हा एक नवीन प्रकार आला आहे. हा नक्षलवाद शहरावर घोंगावत आहे. माझा कार्यक्रम पूर्ण एकायचा, त्याचे ध्वनीचित्रण करून त्यातील काही भाग काढून वाद वाढविण्याचे काम केले जात आहे. येत्या 8 दिवसात शहरात गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांच्या मागे कोण आहे, हे स्पष्ट होईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

आता चमचागिरी करणाऱ्यांना देशाचे उच्च पुरस्कार मिळत नाहीत - सुनील देवधर

पुर्वी आपल्या कामांचे प्रोफाईल घेऊन फिरणाऱ्या, चमचागिरी करणाऱ्यांना पद्मश्री, पद्म विभूषण असे पुरस्कार मिळत होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा ट्रेंड बदलला. ज्यांनी खरच चांगले काम केले आहे, त्यांनाच आता पद्मश्री, पद्म विभूषण सारखे उच्च पुरस्कार मिळतात, असे सांगत विरोधकांवर टिका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com