
लंडन : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार, दिग्गज फलंदाज व सध्याचे समालोचक सुनील गावसकर यांनी खेळाडूंना सामन्यांच्या ताणामुळे देण्यात येत असलेल्या विश्रांतीवर टीका केली आहे. मोहम्मद सिराजने इंग्लंडमध्ये सलग पाच कसोटी सामने खेळत २३ फलंदाज बाद करीत ठसा उमटवला. हाच धागा पकडून सुनील गावसकरांनी परखड मत व्यक्त करताना म्हटले, की सीमारेषेवर आपले जवान, सैनिक कशाचीही पर्वा न करता तैनात असतात. भारतीय क्रिकेटपटूंनीही देशासाठी खेळताना वेदना विसरण्याची गरज आहे.