
Super 50 Maharashtra
Sakal
पुणे : ‘‘ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना शोधून जेईई, नीट यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी विशेष प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने सुरू झालेला ‘सुपर ५०’ हा उपक्रम संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात ‘सुपर ५०’च्या धर्तीवर इयत्ता अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळा सुरू करण्यात येईल. तसेच शालेय जीवनात खेळाला महत्त्व देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘क्रीडा प्रबोधिनी’च्या धर्तीवर शाळा सुरू करण्यात येणार आहे,’’ अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली.