omkar amup
sakal
ओतूर - अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर उदापूर गावच्या हद्दीत निमंत्रण हॉटेलसमोर गुरुवारी (ता. १२) रात्री साडेआठच्या सुमारास सुपर कॅरी मालवाहू गाडी आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार ओंकार दिनकर अमुप (वय-२४, रा. अमुपमळा, उदापूर, ता. जुन्नर) याचा जागीच मृत्यू झाला.