अंद्धश्रद्धेचा कळस; पुण्यात मांत्रिकाने महिलेला नग्न करत घातली अंघोळ | Superstition | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Superstition

अंद्धश्रद्धेचा कळस; पुण्यात मांत्रिकाने महिलेला नग्न करत घातली अंघोळ

पुणे : घरातील भानामती नाहीशी व्हावी, व्यवसायामध्ये भरभराटी यावी आणि घरांमध्ये सुख शांती नांदावी यासाठी पुण्यात मांत्रिकाने महिलेला नग्न करून अंघोळ घातल्याचा घृणास्पद प्रकार घडला आहे. मंत्रिकाने सासू सासऱ्यासमोर आणि आपल्या पतीसमोर महिलेला नग्न करत अंघोळ करायला लावली आहे. या प्रकारानंतर पोलिसांनी आरोपींना अटक करत गुन्हा दाखल केला आहे.

(Superstition in Pune)

या प्रकरणी पती शिवराज गोरडकर, सासरे राजेंद्र कोरटकर, सासू चित्ररेखा कोरटकर यांच्यासह मांत्रिक मौलाना बाबा जमादार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणातील पीडित महिलेचा 2013 मध्ये आरोपी असलेला पती शिवराज गोरडकर याच्या बरोबर विवाह झाला होता. लग्न झाल्यापासून घरातील मंडळीने पीडित महिलेला त्रास देऊन तिच्याबरोबर अनिष्ट प्रथा सुरू केल्या होत्या.

हेही वाचा: भारतीय नागरिकत्व मिळेना; 1500 पाकिस्तानी हिंदू पाकिस्तानात परतले

आरोपींनी मांत्रिक बाबा जमादार यांच्या सांगण्यावरून पीडित महिलेला रायगड जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी नेत तिला मांत्रिकासह सर्व मंडळींच्या समोर नग्न होऊन अंघोळ करण्यास भाग पाडले. त्यानंतर महिलेने दिलेल्या तक्रारीवरून या आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, आजही महाराष्ट्रात माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना घडत असल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

Web Title: Superstition In Pune Women Bath Naked Front Of Husband Mantrik

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..