
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा २४ जून रोजी सुरू होणार आहे. बारावीची लेखी परीक्षा २४ जून ते १६ जुलै आणि दहावीची लेखी परीक्षा २४ जून ते ८ जुलै या कालावधीत घेतली जाणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी दिली आहे.