esakal | तब्बल 2 दिवसानंतर पूर्व हवेलीत प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनाच्या लसीचा पुरवठा

बोलून बातमी शोधा

Supply of corona vaccine at East Haveli Primary Health Center after 2 days of waiting

लोणी काळभोर व उरुळी कांचन  प्राथमिक आरोग्य केंद्रात ५०० लसीचा  साठा उपलब्ध झाला आहे तर कुंजीरवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ३०० लसींचा उपलब्ध आहे. परंतु राज्य सरकारने केलेल्या दोन दिवसांच्या कडक लॉकडाऊनमुळे पूर्व हवेलीतील नागरिक हे घराबाहेरच पडले नाहीत.

तब्बल 2 दिवसानंतर पूर्व हवेलीत प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनाच्या लसीचा पुरवठा
sakal_logo
By
जनार्दन दांडगे

लोणी काळभोर, (पुणे) : पूर्व हवेलीतील लोणी काळभोर कुंजीरवाडी व उरुळी कांचन या प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन दिवसाच्या प्रतीक्षेनंतर कोरोनाच्या लसीचा पुरवठा करण्यात आलेला आहे. मात्र राज्य शासनाने जाहीर केलेल्या विकेंड लॉकडाऊन मुळे शनिवारी (ता. १०) लस घेणाऱ्या नागरिकांची गर्दी वरील तिन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रावर कमी प्रमाणात आढळून आली. देशासह राज्यात पूर्ण लसीकरण सुरू आहे परंतु मागील दोन दिवसात जिल्ह्यातील कोरोना  प्रतिबंधात्मक लस संपल्यामुळे पूर्वे हवेलीतील आरोग्य केंद्रावरून नागरिकांना लसीकरणापासून वंचित राहून रिकाम्या हाताने परत जावे लागले होते.

वाळूमाफियांचा सुळसुळाट! मंडळ आधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न; टिप्पर घातला...

लोणी काळभोर व उरुळी कांचन  प्राथमिक आरोग्य केंद्रात ५०० लसीचा  साठा उपलब्ध झाला आहे तर कुंजीरवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ३०० लसींचा उपलब्ध आहे. परंतु राज्य सरकारने केलेल्या दोन दिवसांच्या कडक लॉकडाऊनमुळे पूर्व हवेलीतील नागरिक हे घराबाहेरच पडले नाहीत. त्यामुळे या तिन्ही केंद्रावरील लस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या ही अतिशय थोड्या प्रमाणात होती. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

''हवेली तालुक्यासाठी सहा हजार जणांसाठी पुरेल एवढी लस उपलब्ध झाली आहे. ज्याप्रमाणे लसीचा कमतरता असल्याने जसे वॅक्सिन उपलब्ध होईल त्याप्रमाणे आवश्यकतेनुसार ते लसीकरण केंद्रावर पाठवण्यात येईल. सद्या स्थितीत आरोग्य विभागाकडून ४५ वर्षावरील नागरिकांना लस देण्याचे आदेश आले असल्याने ४५ वर्ष वयोगटाच्या खलील नागरिकांनी लसीकरण केंद्रावर नाहक गर्दी करू नये.'' 

- डॉ. सचिन खरात, हवेली तालुका आरोग्य अधिकारी