Sunetra Pawar : विकासाची वाट अधिक गतीने पुढे नेहण्यासाठी अजितदादांच्या विचाराला साथ द्या; सुनेत्रा पवार यांचे आवाहन

बारामती तालुक्यात माळेगाव विकासाच्या बाबतीत पुढारलेले गाव आहे. अजितदादांनी या गावाच्या वैभवात भर घालण्यासाठी स्थानिक पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्या मदतीने लोकाभिमूख योजना राबविल्या आणि येथील नागरिकांचे राहणीमान उंचविले.
Support Ajit pawar idea to development forward at faster Appeal of Sunetra Pawar lok sabha election
Support Ajit pawar idea to development forward at faster Appeal of Sunetra Pawar lok sabha electionSakal

माळेगाव : बारामती तालुक्यात माळेगाव विकासाच्या बाबतीत पुढारलेले गाव आहे. अजितदादांनी या गावाच्या वैभवात भर घालण्यासाठी स्थानिक पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्या मदतीने लोकाभिमूख योजना राबविल्या आणि येथील नागरिकांचे राहणीमान उंचविले.

सहाजिक ही विकासाची वाट अधिक गतीने पुढे नेहण्यासाठी माळेगावकरांनी अजितदादांच्या विचाराला साथ द्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टींच्या बारामती लोकसभेच्या संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार यांनी केले.

माळेगाव बुद्रूक (ता. बारामती) येथील माजी सरपंच दिपक तावरे यांनी महिला दिनानिमित्त सौ. सुनेंत्रा पवार यांच्या उपस्थितीत नागेश्वर मंदीरात महाभिषेक, अन्नदानासह विविध कार्य़क्रमाचे आय़ोजन केले होते. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सौ.पवार बोलत होत्या.

माळेगावची आजवर साथ विचारात घेवून खरेतर अजितदादांनी या गावाचा चेहरामहोरा बदलविला. विविध योजना राबविल्या. मुलभूत प्रश्न सोडविले, याकडे सौ. पवार यांनी यावेळी उपस्थितांचे लक्ष वेधले.

तत्पुर्वी अॅड.राहूल तावरे म्हणाले,`` माळेगाव शहराला वैभवशाली ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. हे वैभव अधिक गतीने पुढे नेहण्यासाठी अजितदादांनी गेली अनेक वर्षे प्रामाणिक प्रय़त्न केले आहेत.

त्यामुळेच माळेगाव दादांच्या विचाराला राजकियदृष्ट्या साथ देत आहे. `` कार्य़कर्ते अमर तावरे यांनीही माळेगावचे नागरीक विकास कामे डोळ्यासमोर ठेवूनच योग्य ती भूमिका लोकसभेच्या निवडणूकीत घेतली असे सांगितले.

यावेळी सौ.सुदर्शना तावरे, सौ. राधा तावरे, कमलाताई ढाळे, सौ.पाटोळे, दिपक तावरे, संग्राम तावरे, राहूल तावरे, शिवराज जाधवराव, रणजित तावरे, अमर तावरे, वसंतराव तावरे, रामभाऊ वाबळे, अविनाश गोफणे, चंद्रकांत जाधव, सुरेश झगडे, नितीन तावरे, अनिल काटकर, लक्ष्मण भोसले, विलास तावरे, प्रणव तावरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सुनेत्रा पवारांनी व्यक्त केले समाधान...

बारामती लोकसभेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर कार्य़कर्त्यांसह महिलांचा संच उभारण्यासाठी माजी सरपंच दिपक तावरे आदी कार्य़कर्त्यांनी माळेगावात प्रय़त्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून खरेतर शुक्रवार (ता.८) रोजी महिला दिन, महाशिवरात्रीनिमित्ताने तावरे यांनी अन्नदानासह विविध कार्य़क्रम यशस्वी केले. हे आशादायक चित्र पाहून सौ. सुनेत्रा पवार यांनी समाधान व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com