मुख्य फिचर- बातमी जोड

मुख्य फिचर- बातमी जोड
Published on: 

केंद्र, दिल्ली पोलिसांना नोटीस
‘जंतरमंतर’वरून आंदोलन स्थळ इतरत्र हालविण्यात आल्याच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे. ‘उभयतांच्या उत्तरावर समाधान झाले नाही तर कायदा आपला निर्णय घेईल,’ अशी टिपणी सरन्यायाधीश सूर्य कांत, न्या. जॉयमल्या बागची आणि न्या. व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने केली. ‘महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा, वाहतूक कोंडी आणि नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेत जंतरमंतर ऐवजी रामलीला मैदान, बुराडी आणि ‘सीबीडी’ मैदानात यापुढील काळामध्ये आंदोलने करता येतील,’ असे गृह मंत्रालयाने म्हटले होते. दुसरीकडे काँग्रेस, आम आदमी पक्षासह अन्य विरोधकांनी सरकारच्या आंदोलनस्थळ बदलण्याच्या निर्णयाला आक्षेप घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये याच मुद्यावरून याचिकाही दाखल करण्यात आली आहे.

‘लहरा दो तिरंगा’वर बंदी नाही
तिरंगा फडकाविल्याने देशात कधीपासून शांतता आणि कायदेभंग होऊ लागला? ब्रिटिशांच्या काळामध्ये देश पारतंत्र्यात असताना तिरंगा फडकाविण्यावर बंदी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा आज तेच करीत आहेत, असा आरोप करून उद्या (ता.१६) सायंकाळी पाच वाजता दिल्लीच्या कॅनॉट प्लेससह देशवासीयांनी सर्वत्र तिरंगा फडकाविण्याचे आवाहन कॉक्रोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांनी आज पत्रकार परिषदेत केले. दीपके यांच्या आवाहनामुळे सात दिवसांमध्ये दुसऱ्यांदा आंदोलक आणि दिल्ली पोलिस आमनेसामने आले आहेत
(सविस्तर वृत्त पान.....वर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com