
पुणे - वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईत अतिरिक्त पैशांची मागणी केल्यानंतर त्याचे चित्रीकरण समाज माध्यमावर व्हायरल केले म्हणून वाहनचालकावर दाखल केलेला गुन्हा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. वाहन चालकावर फौजदारी कारवाई चालविण्यास परवानगी दिली तर ते कायद्याच्या प्रक्रियेचा दुरुपयोग असेल, असे न्यायालयाने निकालात नमूद केले आहे.