
'जब भूक लगती है तब...', सुप्रिया सुळेंना आठवल्या सुष्मा स्वराज
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने वाढलेल्या महागाईविरोधात आंदोलन केलं. यावेळी कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात घोषणाबाजी केली. या सरकारला झोपेतून उठवण्यासाठी वासूदेवाला आणल्याचं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितलं. राज्यात काही नेते भोंग्यांचं राजकारण करून महत्वाच्या महागाईच्या मुद्द्यांना बगल देत असल्याचा आरोप शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली.
याठिकाणी भाजपचा झेंडा उलटा लावण्यात आला होता. राज ठाकरेंची नक्कल करत एका पदाधिकाऱ्याने हनुमानाला साकडं घातलं. राष्ट्रवादीच्या वतीने महागाई कमी करण्यासाठी महाआरती देखील करण्यात आली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थिती लावली. केंद्र सरकारला सुबुद्धी येऊ दे, नको त्या विषयांना महत्व देऊन केंद्र सरकार झोपायचं सोंग घेत आहे. त्याला जागं करण्याचं काम आम्ही करत असल्याचं सुळे यांनी सांगितलं.
खासदार सुप्रिया सुळेंनी या आंदोलनाला उपस्थिती लावली. महागाईचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. सिलेंडर मोफत दिला. पण तो पुन्हा महिलांना भरता आला नाही. सरकार मोफत देईल, ही थाप मारण्यात आली. सबसीडी सरेंडर करण्याचं आवाहन झालं. त्यासाठी गरीब महिलांना पैसे देण्याची मदत करण्यात आली. पंतप्रधानांवर विश्वास ठेवला. मात्र, असं काही घडलं नाही
जब भूक लगती है, तब धान लगता है
महागाईचा भडका उडणार असल्याचं मी सतत संसदेत सांगितलं होतं. आम्हाला हे सातत्याने दिसत होतं. मात्र केंद्र सरकारला हे काही दिसत नाहीय. सीएनजीमध्ये एक हजार कोटी अनुदान देऊन कमी केले आहे. देशाचं सरकारने हे निर्णय घ्यायचे असतात.
२०१३ मध्ये महागाई सुरू असताना आता चार पट महागाई झाली आहे. मला आज सुष्मा ताईंचं भाषण भावलं होतं. आँकडों से पेट नही भरता, जब भूक लगती है तब धान लगता है, असं त्या म्हणाल्या होत्या. मला हाच प्रश्न आज पुन्हा या सरकारला विचारायचा आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
Web Title: Supriya Sule Alleges Modi Government Over Inflation
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..