Pune आई प्रतिष्ठान च्या वतीने गरजवंतांची 'दिवाळी' साजरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune

गरजूंना दिवाळीच्या निमित्ताने मदतीचा हातभार लागावा व त्यांचीही दिवाळी गोड व्हावी

Pune : आई प्रतिष्ठान च्या वतीने गरजवंतांची 'दिवाळी' साजरी

बारामती, ता. 23- गरजूंना दिवाळीच्या निमित्ताने मदतीचा हातभार लागावा व त्यांचीही दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने बारामतीत सत्यव्रत काळे यांच्या आई प्रतिष्ठानकडून केलेला उपक्रम विधायक असल्याचे प्रशंसोदगार खासदार सुप्रिया सुळे यांनी काढले.

आई प्रतिष्ठानच्या वतीने एक हजार कुटूंबाना दिवाळी फराळ, अभ्यंग स्नान किट वाटप व महिलांना साड्या वाटप सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाले, या प्रसंगी सुळे बोलत होत्या. वर्षभरात विविध सामाजिक उपक्रम राबवून महिलासाठी बचत गट स्थापन, तुळजापूर दर्शन, शिलाई मशीन वाटप यासह इतरही सत्यव्रत काळे यांचे कार्य उल्लेखनीय असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. गरजूंची दिवाळी गोड होऊन त्यांनाही हातभार लावता यावा या उद्देशाने सदर कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे अध्यक्ष सत्यव्रत काळे यांनी सांगितले.

या प्रसंगी संभाजी होळकर, सचिन सातव, नवनाथ बल्लाळ, शुभांगी चौधर, डॉ. सुहासिनी सातव, आरती शेंडगे, अनिता गायकवाड, राजेंद्र ढवाण, अल्ताफ सय्यद, इमरान पठाण, विपुल ढवाण, नीलेश कोठारी, संतोष जगताप, मुस्तफा हवेलीवाला, दिलीप ढवाण, पार्थ गालिंदे, प्रताप पागळे, राहुल जाधव, तैनूर शेख उपस्थित होते. स्वागत आई प्रतिष्ठानचे सत्यव्रत अर्जुनराव काळे यांनी केले. सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले