सुप्रियाताईंनी भरले तिच्या स्वप्नांच्या पंखांना गगनभरारीचे बळ  

supriya sule
supriya sule

इंदापूर (पुणे) : खासदार सुप्रिया सुळे यांनी 2 लाख रुपयांची तातडीची मदत केल्यामुळे तेजस्वी उकिरडे या विद्यार्थिनीचा परदेशात लंडन येथे उच्च शिक्षण घेण्याचा मार्ग सुकर झाला आहे. आता ती २१ सप्टेंबर रोजी लंडनला उडाण घेणार आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 
इंदापूर नगरपरिषदेत सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या रमेश उकिरडे यांची कन्या तेजस्वी हिची फॉरेन्सिक सायन्समधील एमस्सी या दोन वर्षांच्या मास्टर पदवीसाठी ब्रिटनमधील टेस्सीड विद्यापीठात शिकण्यासाठी निवड झाली. मात्र, घरच्या गरीब परिस्थितीमुळे तिची उच्च शिक्षण घेण्याची संधी हुकते की काय आहे, अशी स्थिती निर्माण झाली होती. तिची निवड झाल्यानंतर तिच्या सत्कारासाठी अनेक नेत्यांनी गर्दी केली होती. मात्र, तिला प्रत्यक्ष मदत करण्याची वेळ आली, त्यावेळी अनेकांनी तिची निराशा केली.

ही बाब इंदापूर नगरपरिषदेचे नगरसेवक दादासाहेब सोनवणे यांना समजली. त्याननंतर त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांना ही माहिती दिली. त्यानंतर त्यांनी खासदार सुप्रिया सुळे व सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या कानावर ही बाब घातली. तिला व्हिसा, प्रवास व इतर बाबींसाठी एकूण तीन लाख रुपयांची मदत हवी होती. नगरसेवक दादासाहेब सोनवणे, सुरेशमिसाळ व जितेंद्र जाधव यांनी मदतीचे आवाहन करताच अनिता लोढा, अॅड. राहुल मखरे, धरमचंद लोढा, पियुष बोरा, प्रशांत सिताप, बाळासाहेब क्षीरसागर व सहकाऱ्यांनी 50 हजार, तर राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे परिवाराच्या वतीने कै. भगवानराव भरणे पतसंस्थेचे अध्यक्ष मधुकर भरणे यांच्या हस्ते 50 हजार रुपयांची मदत करण्यात आली. मात्र, आणखी 2 लाख रुपयांची गरज होती. त्याची पूर्तता खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. त्यामुळे तिची गरूडभरारी सोपी झाली आहे.

यासंदर्भात तेजस्वी उकिरडे म्हणाली की, खासदार सुप्रिया सुळे यांनी मला अडचणीच्या वेळी मोठी ताई म्हणून मदत केली असून, शिकून मोठी हो, सावित्रीची लेक हो, असा संदेश दिला आहे. त्यामुळे आपला देश, राज्य, खासदार सुप्रिया सुळे, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, मदत करणारे सर्व सहकारी आणि इंदापूर तालुक्याचे नाव उंचावण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com