Ajit Pawar-Supriya Sule: सुप्रिया सुळेंनी केली मागणी अन् अजित पवारांनी मंचावरुनच लगावला टोला; नेमकं काय घडलं?

Pune hospital event :आज पुण्यामध्ये पालिकेच्या मल्टिस्पेशलिस्ट हिलिंग हॉस्पिटलचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या एकाच मंचावर आले होते.
ajit pawar supriya sule
ajit pawar supriya suleesakal

पुणे- आज पुण्यामध्ये पालिकेच्या मल्टिस्पेशलिस्ट हिलिंग हॉस्पिटलचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या एकाच मंचावर आले होते. यावेळी अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांना व्यासपीठावरुन टोला लगावल्याचं पाहायला मिळालं. तसेच एकमेकांना बोलणं दोन्ही नेत्यांनी टाळलं आहे.

नगरससेवकांच्या निवडणुका लवकरात लवकर घेण्यात याव्या अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी व्यासपीठावरुन सरकारकडे केली होती. याला उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, निवडणुका सरकारमुळे नाही तर सुप्रीम कोर्टामध्ये रखडल्या आहेत. निवडणुका घेण्याची महायुतीची भूमिका आहे.

दोन वर्षांपेक्षा जास्त काळ झालं महापालिका, नगरपरिषदांच्या निवडणुका थांबल्या आहेत. या निवडणुका सुप्रीम कोर्टामुळे थांबल्या आहेत. आम्ही देखील लोकांमधून निवडून आलेले कार्यकर्ते आहोत. विविध भागातील कार्यकर्त्यांना संधी मिळावी अशी आमचीही इच्छा आहे. पण, ओबीसीच्या मुद्द्यावरुन सुप्रीम कोर्टात अजून निर्णय झालेला नाही. निवडणुका लवकरात लवकर व्हाव्यात अशीच महायुती सरकारची भूमिका आहे, असं अजित पवार म्हणाले.

ajit pawar supriya sule
अजित पवार गटाचे मंञी संजय बनसोडे यांच तुतारी वाजवून स्वागत; राजकीय चर्चेला उधान

सगळं काही दोन दादांनीच केलंय

मीच इथे अनेक नगरसेवकांना निवडून आणलं आहे. काही, नगरसेवक चंद्रकांत दादांनी निवडून आणले आहेत. म्हणजे दोन्ही दादांनीच लोकं निवडून आणलेले आहेत. इतर कोणीही निवडून आणलेलं नाही. भाजपचा किंवा राष्ट्रवादीच्या दादानंच हे केलं आहे. या दोन वर्षात अनेक काम झाली आहेत, मागे सात वर्षात-दहा वर्षात झाल्याचं म्हटलं जातं पण ते खोटं आहे, असं पवार म्हणाले.

महायुतीचं सरकार काम करत आहे. निवडणुकीच्या निमित्ताने काही लोकं सांगतील. त्यांचं ऐकू नका. आता तिसऱ्यांदा मोदी यांना पंतप्रधान करायचं आहे, असं अजित पवार म्हणाले आहेत. आज जवळपास पाचशे कोटींच्या कामाचे उद्घाटन केले जात आहे. लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागणार आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज ऑनलाईन पद्धतीने कोट्यवधी रुपयांच्या योजनांचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती अजित पवारांनी दिली.

ajit pawar supriya sule
Ajit Pawar: नऊ नव्वदचा...फॉर्म्युला फिस्कटल्यामुळे अजित पवार भाजपवर नाराज?

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

माझी एक मागणी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नगरसेवकांच्या निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे आपल्या मायबाप जनतेने कुणाकडे जावं असा प्रश्न पडत आहे. सत्तेचे विकेंद्रीकरण व्हावं असं स्वप्न आदरणीय दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी पाहिलं होतं. त्यासाठी एका नगरसेवकाची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे सरकारने निवडणुका लवकरात लवकर घेतल्या तर बरं होईल, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com