esakal | सुप्रिया सुळे यांनी घेतली आयपीएस वैभव निंबाळकरांची भेट
sakal

बोलून बातमी शोधा

सुप्रिया सुळे यांनी घेतली आयपीएस वैभव निंबाळकरांची भेट

सुप्रिया सुळे यांनी घेतली आयपीएस वैभव निंबाळकरांची भेट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बारामती : मिझोरममध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी गोळीबारात जखमी झालेल्या देशातील युवा आयपीएस अधिकारी म्हणून नावाजलेल्या वैभव निंबाळकर यांची आज खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली.

आसाम मिझोरम वादात काही दिवसांपूर्वी झालेल्या गोळीबारात वैभव यांच्या पायाला गोळी लागून ते जखमी झाले होते. त्या नंतर उपचारासाठी ते पुण्यात आले आहेत. सुप्रिया सुळे यांच्या लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्यातील सणसर हे वैभव यांचे मूळ गाव. आज पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी जाऊन सुळे यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी वैभव यांना सन्मानित केलेले असून आसामच्य पोलिस महासंचालकांनीही त्यांच्या कामगिरीची दखल घेत त्यांना सुवर्णपदक प्रदान केले आहे. सुप्रिया सुळे यांनी वैभव यांच्या कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन करत त्यांच्या तब्येतीसाठी शुभेच्छा दिल्या.

आसाम व मिझोरममधील परिस्थिती व तेथील घडामोडींची माहिती वैभव यांनी या भेटीमध्ये सुप्रिया सुळे यांना दिली. सध्या परिस्थिती निवळलेली असली तरी त्या काळात तेथील स्थिती कमालीच्या तणावाची होती व त्या काळात वैभव यांनी जी भूमिका पार पाडली त्याचे कौतुक सुळे यांनी केले. मराठी मुलगा एका उच्च पदावर जाऊन जबाबदारी अंगावर घेऊन काम करतो याचे त्यांनी कौतुक केले.

या प्रसंगी त्यांच्या पत्नी अनुजा, वडील चंद्रकांत निंबाळकर, आई संगीता निंबाळकर, त्यांची बहीण व अभिनेत्री उर्मिला निंबाळकर, उर्मिला यांचे पती सुकिर्त गुमास्ते, अनुजा यांच्या आई शीतलताई गोरे आदी उपस्थित होते.

loading image
go to top