Discussions Ongoing Between Both NCP Factions
sakal
पुणे : "उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडील व आमच्या पक्षातील काही पदाधिकाऱ्यांची महापालिका निवडणूक एकत्र लढण्याविषयी चर्चा सुरू आहे. कार्यकर्ता, पुणेकर व पुण्याचा विकास हा केंद्रबिंदू ठेवूनच निर्णय घेतला जाईल, मात्र अद्यापपर्यंत कुठलाही प्रस्ताव आला नाही' असे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी स्पष्ट केले. तर, बुधवारी सुळे या पक्षाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबतची भूमिका मांडणार आहेत.